ऑनलाईन मागवलं Sanitary pad मिळाल भलतंच पहा बातमी सविस्तर.
सध्याच्या काळामध्ये अनेक जणonline खरेदी करतात, अनेक गोष्टी घरबसल्या मागवतात. अगदी सोपा आणि काही क्षणात ऑर्डर देऊन आपल्याला ज्या वेळेत हवा आहे त्या वेळेत आपल्याला ती वस्तू उपलब्ध होते अगदी घरबसल्या ती घरपोच वस्तू मिळते त्यामुळे अनेक जण ऑनलाईन पद्धतीने खरेदी करण्याचा पर्याय नोंदवतात मात्र ऑनलाईन खरेदी करताना कधी कधी आपण मागवलेली वस्तू नाही येत दुसरीही वस्तू येऊ शकते ते अगदी नजर चुकीने होतं
मात्र एका तरुणी सोबत अत्यंत धक्कादायक असं घडलं तिने सॅनिटरी पॅड मागवले होते तिला कार्ड सोबतच आणखीही काही वस्तू मिळाल्या आणि ते पाहून ती अवाक झाली,काही वेळा ऑनलाईन ऑर्डर केलेल्या वस्तूंऐवजी दुसरंच काही तरी भलतंच मिळतं. अशी किती तरी प्रकरणं आहेत. असाच अनुभव नुकताच एका महिलेलाही आला. जिने ऑनलाईन सॅनिटरी पॅड ऑर्डर केलं पण तिला त्यासोबत आणखी एक अशी वस्तू मिळाली जी पाहून ती थक्क झाली. जसं तिने डिलीव्हरी मिळालेलं पार्सल खोललं तसं तिला झटकाच बसला.
ऑनलाईन सॅनिटरी पॅड मागवणाऱ्या या महिलेने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तिने ट्विटरवर पोस्ट करत याची माहिती दिली आहे. समीरा असं या महिलेचं नाव आहे.मी स्विगी इन्स्टामार्टवरून सॅनिटरी पॅड्स मागवले होते आणि मला बॅगेच्या तळाला चॉकलेट कुकीजही सापडले. हे स्विगी की दुकानदाराने पाठवले मला नक्की माहिती नाही”महिलेचं हे ट्विट पाहिल्यानंतर स्विगी इन्स्टामार्टने यावर रिप्लाय दिला आहे. स्विगी केअर्स ट्विटर अकाऊंटवर महिलेला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे.
समीरा आम्हाला तुझा दिवस आनंदात जावा असं वाटत होतं, असं स्विगीने म्हटलं आहे.दरम्यान यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. जाहिरात म्हणून स्विगी आपल्या ग्राहकांना अशा मोफत वस्तू देतं, असं काही नेटिझन्सनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे.