नवरदेवाला सासऱ्याची खास भेट, कार ऐवजी दिला बुलडोझर, आता जा कामाला ! पहा बातमी सविस्तर.
‘हुंडा नको फक्त मुलगी द्या’ अस सर्वजन म्हणतात, मात्र अनेक महागडे गिफ्ट मागितले जातात , ते मुलीचे वडील देतात कारण आपल्याला मुलीला पुढे त्रास नको म्हणून अनेक जन नवरदेवाचे लाड केले जातात,लग्नामध्ये कोण काय भेट देईल, याचा काही नियम राहिला नाही. लग्नामध्ये आता फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी, दुचाकी, चारचाकी अशा वस्तू भेट देण्याचं प्रमाण वाढू लागलं आहे.उत्तर प्रदेशातल्या राजकारणाचा विचार केला तर तिथे बुलडोझर व तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं सरकार यांचं वेगळंच समीकरण जुळलं आहे.
मागच्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये बुलडोझरची बरीच चर्चा झाली होती; मात्र आता बुलडोझरची चर्चा वेगळ्या कारणाने सुरू झाली आहे. हमीरपूर जिल्ह्यात एक अनोखा विवाह झाला असून, त्यात ‘योगी’ नावाच्या नवरदेवाला बुलडोझर भेट देण्यात आला. लग्नात देण्यात आलेल्या या बुलडोझरचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.सेवानिवृत्त सैनिक परशुराम हे देवगाव, डेव्हलपमेंट ब्लॉक, सुमेरपूर इथले रहिवासी असून, त्यांची मुलगी नेहा हिच्या लग्नात हा प्रकार घडलाय. परशुराम यांनी त्यांच्या सैनिक जावयाला आलिशान कारऐवजी बुलडोझर दिलाय.
याच कारण हि असच आहे , परशुराम यांची मुलगी नेहा हिचा विवाह नौदलात कार्यरत असलेले सौनखार इथले योगेंद्र उर्फ योगी प्रजापती यांच्याशी 15 डिसेंबर 2022 रोजी झाला. सुमेरपूरच्या एका गेस्ट हाउसमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. यामध्ये निवृत्त सैनिकाने मुलीला आलिशान कार नाही, तर बुलडोझर दिला. 16 डिसेंबर 2022 ला मुलगी बुलडोझर घेऊन सासरी निघून गेल्यावर लोक बघतच राहिले. परशुराम प्रजापती सांगतात की, ‘माझी मुलगी सध्या यूपीएससीची तयारी करत आहे. तिला नोकरी मिळाली नाही, तर तिला बुलडोझरमुळे रोजगार मिळू शकेल.’ दुसरीकडे योगींना मिळालेल्या या बुलडोझरची चर्चा सर्वत्र जोरदार सुरू आहे.
दरम्यान, लग्नामध्ये कोण काय भेट देईल, याचा काही नियम राहिला नाही. लग्नामध्ये आता फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी, दुचाकी, चारचाकी अशा वस्तू भेट देण्याचं प्रमाण वाढू लागलं आहे. अनेकदा लग्नातल्या या भेटवस्तूंची वऱ्हाडी मंडळीमध्ये चर्चाही असते. परंतु उत्तर प्रदेशमध्ये एका लग्नात बुलडोझर भेट दिल्यामुळे त्याची चर्चा जोरदार सुरू झाली आहे. कारण सहसा अशा पद्धतीची अनोखी भेट नवरदेवाला मिळू शकते, असा विचारही कोणी केला नसेल.