कॉंग्रेस

राजकारणात मोठा भूकंप : बाळासाहेब थोरात यांनी उचलले टोकाचे पाऊल , पहा बातमी सविस्तर

संगमनेर राजकारणात सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिल, ते पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकी मध्ये आ. सत्यजित तांबेने काँग्रेस मधून जो बंड पुकारला त्यामुळे चर्चा झाली. पुन्हा एकदा तसच काहीस होतय ,
राजकीय वर्तुळातला आत्ताचा सर्वात मोठा भूकंप होतोय तो म्हणजे काँग्रेस सोबत एकनिष्ठ राहिलेले जुने जाणते काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिलाची बातमी वाऱ्यासारखे पसरलीयामुळे नेमकं राजकारणात चाललंय तरी काय आणि काँग्रेसचा पुढे काय होणार याबद्दल अनेकजण चर्चा करत आहेत

सध्या काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. जेष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिला आहे.
यामुळे काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्य काँग्रेस कमिटीमध्ये मोठी घुसपुस सुरू होती
नाशिक मतदारसंघात कोणाला उमेदवार देयची यावरून हा वाद सुरू झाला होता.

काँग्रेसने सत्यजीत यांचे वडील सतीश तांबे यांना तिकीट दिले होतं. पण त्यांनी फॉर्म भरलाच नाही.अखेर सत्यजीत यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. सत्यजीत निवडून देखील आले होते.यानंतर थोरात विरुद्ध पटोले हा वाद समोर आला होता. पटोलेंबरोबर काम करणं शक्य नाही असे थोरात यांनी पत्र लिहून हायकमांडला कळवले होते.

मात्र असे असताना आता थोरात त्यांनी थेट विधिमंडळ पक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
दरम्यान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बाळासाहेबांच्या राजीनाम्यासंदर्भात माहिती नसल्याचे सांगितले आहे.
आता त्यांच्या राजीनाम्यावर हायकमांड काय निर्णय घेणार हे लवकरच समजेल. मात्र काँग्रेससाठी हा एक मोठा धक्का आहे.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Share this news instead of copying!