नगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करणारा जमावाच्या मारहाणीत मृत्यू.

तोफखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल, चार जणांना अटक.
अल्पवयीन मुलासोबत ( वय 4 ) अनैसर्गिक कृत्य करणार्या व्यक्तीचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात चौघांना तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे.
राजेंद्र रामकृष्ण नायर (वय 36 रा. बोल्हेगाव आखाडा, वाकळे वस्ती), अझर शाब्बीत शेख (वय 19 रा. गांधीनगर, बोल्हेगाव), सिंकदर मेहमुद शहा (वय 19 रा. संभाजीनगर, बोल्हेगाव) व सोमनाथ बापु गायकवाड (वय 38 रा. गांधीनगर, बोल्हेगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
त्यांना बुधवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. पुर्वा महेंद्र नांगरे ( वय 20 रा. कोळपेवाडी, ता. कोपरगाव ) यांनी फिर्याद दिली आहे. राजेश काशिनाथ सोनार ऊर्फ सोनार बाबा (वय 55 मुळ रा. भेंडा ता. नेवासा, हल्ली रा. गांधीनगर, बोल्हेगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.सोनार बाबा याने सोमवारी रात्री एका अल्पवयीन मुलाला घरामध्ये घेऊन जात त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना घडली होती.
मुलगा घराच्या खाली असलेल्या किराणा दुकानामध्ये गेला होता व तो 10 ते 15 मिनिटे होऊन देखील न आल्याने त्याच्या आईने त्याचा शोध घेतला असता तो सोनार बाबाच्या घरात मिळून आला. सोनार बाबाने मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची फिर्याद मुलाच्या आईने दिली होती. दरम्यान घडलेल्या प्रकारानंतर फिर्यादी यांनी आरडाओरडा केला असता तेथे स्थानिक नागरिक जमा झाले. त्यांनी सोनार बाबाला मारहाण केली सदर प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.