नगर ब्रेकिंग: सोशल मीडियावर ओळख केली ब्लॅकमेल करून तरुणीवर चार महिने केला बलात्कार.

सोशल मीडिया इंस्टाग्रामवर आधी मैत्री केली मैत्री करून जवळीक साधली आणि जवळीक साधून एका महाविद्यालयीन शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थिनीवर त्याने बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले
आरोपी हा बीड जिल्ह्यातील असून मजुरी करणारा आहे व तो विवाहित देखील आहे. या आरोपीला लोणी पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री औरंगाबाद मधुन जेरबंद केला गेला. मिळालेली माहिती अशी की, 2019 च्या आधी त्यांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली ओळख झाल्यानंतर त्या तरुणीसोबत मैत्री करण्यासाठी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील लोणी इथले गाव निवडले
लोणी येथील बसस्थानकावर त्या दोघांची भेट झाली व लोणी मधील एका हॉटेल मध्ये तिला घेऊन गेला आणि तिचे फोटो काढले व त्या फोटोचा आधार घेऊन तो तिला ब्लॅकमेल करून सप्टेंबर ते डिसेंबर असे चार महिने तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध ठेवत होता. याबाबत त्या महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलीने मात्र आपल्या घरी कसलीही गोष्ट सांगितली नाही पण नंतर त्या तरुणाबाबत मिळालेली माहिती अशी की, तो तरुण हा विवाहित असूनही मुलीच्या वडिलांना फोटो पाठवून त्या मुलीसोबत लग्न करण्यासाठी त्यांना धमक्या देखील देत होता अखेर त्या तरुणाच्या त्रासाला कंटाळून त्या तरुणाविरुद्ध लोणी पोलिसांमध्ये त्यांनी तक्रार दाखल केली आहे