झोमॅटो बॉयकडून तरुणीचा किस, शहरातील खळबळजनक घटना पहा बातमी सविस्तर.

हि खाद्य पुरवणारी एजन्सी आहे, हि एक खासगी कंपनी असून कधी चांगली तर कधी वाईट बातमी यांच्याबाद्दल आपल्या समोर येत असते. घरपोहोच सेवा देण्यासाठी हि कंपनी काम करत असते. असाच एक घर पोहोच करण्यासाठी एका ठिकाणाहून ऑर्डर दिली जाते. आणि झोमॅटो ॲपच्या डिलिव्हरी बॉयने एक खूप मोठी चूक आपल्या ग्राहकासोबत केली आहे.
झोमॅटो ॲपच्या डिलिव्हरी बॉयने गैरवर्तन केल्यामुळे पुण्यामध्ये खळबळ माजली आहे. जेवणाचे पार्सल घेऊन आलेल्या एका व्यक्तीने चक्क 19 वर्षीय तरुणीचे जबरदस्तीने चुंबन घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. सदरील घटना येवलेवाडी परिसरातील एका नामांकित सोसायटीत शनिवारी रात्री प्रकार घडला. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
गैरवर्तन करणाऱ्या झोमॅटो ॲपच्या डिलिव्हरी बॉयचे नाव रईस शेख असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. 40 वर्षांचा रईस शेख हा कोंढव्यात राहतो. 19 वर्षीय तरुणीने याप्रकरणी फिर्याद दिली होती, त्यावरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. शनिवारी रात्री 9.30 च्या सुमारास रईस जेवणाची ऑर्डर घेऊन पीडित मुलीच्या घराच्या दरवाजावर आला. मुलीने जेवणाची ऑर्डर घेतल्यानंतर रईसने तिच्याकडे पाण्याची मागणी केली. पाणी पिऊन झाल्यानंतर थॅन्क्यू म्हणण्यासाठी रईसने मुलीचा हात धरला आणि दोन वेळा गालावर चुंबन घेतलं, असं मुलीने तिच्या तक्रारीमध्ये म्हणलं आहे.
पुण्यात घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला.आपल्या शहरांमध्ये मोठ्या प्रमणावार फूड डिलिव्हरी ॲपच्या माध्यमातून जेवणाची ऑर्डर दिली जाते. फूड डिलिव्हरी अॅप करणाऱ्या कंपन्या त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत कागदपत्रांची तपासणी करतात का ? तसंच या कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी आणि इतिहास माहिती करून घेतात का ? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने पुन्हा एकदा उपस्थित झाले आहेत. पण अश्या नावाजलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून असे गैरवर्तन घडणे अत्यंत चुकीचे आहे.