सोयगाव बचत भवन येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न.
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी.
जिल्हा परिषद औरंगाबाद अंतर्गत पंचायत समिती सोयगाव येथे राष्ट्रीय ग्रामीण स्वराज्य अभियान आमचा गाव आमचा विकास जीपीडीपी उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत वित्त आयोगाची विकास आराखडा सादर करणे या संदर्भात दोन दिवसाची प्रशिक्षण बचत भवन पंचायत समिती येथे 27.9 . 2022 ते 28 .9. 2022 मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद यांच्या आदेशान्वये सदर प्रशिक्षणास गटविकास अधिकारी श्री पी व्ही नाईक श्री बी.टी साळवे विस्तार अधिकारी पंचायत श्री पडलवार एम सी प्रशासन अधिकारी श्री पवार श्री डी एस साळुंखे कृषी विस्ताराधिकारी यांच्या मार्गदर्शनाने पंचायत समिती सोयगाव येथे आयोजित करण्यात आले.
सदर प्रशिक्षणास सर्व ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामसेवक संगणक चालक अंगणवाडी पर्यवेक्षिका हजर होते सदर प्रशिक्षणात जिल्हास्तरीय प्रवीण शिक्षक श्रीमती भारतीय घटमल श्री संतोष वानखेडे यांनी प्रशिक्षणात 9 शाश्वत सविस्तर योजनांची माहिती दिली.
1 गरिबी मुक्त गाव 2 आरोग्यदायी गाव 3 बालस्नेहगाव 4 जलसमृद्ध गाव 5 स्वच्छ व हरित गाव 6 पायाभूत सुविधायुक्त गाव 7सामाजिक न्याय आणि सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव 8 सुशासन युक्त गाव 9 लिंग समभायुक्त गाव महिला स्नेही गाव इत्यादी संकल्पनेवर प्रशिक्षण देण्यात आले. सदरील प्रशिक्षणामुळे उपरोक्त योजना व्यवस्थित चालवण्यासाठी ज्या शंका अडीअडचणी ग्रामसेवकांना येत होत्या त्या अडीअडचणी दूर झालेल्या आहेत त्यामुळे विविध योजना कामे सुरळीत व मोठ्या प्रमाणात पार पाडण्यास मदत होईल……..