बुरखा घालून आलेली एक महिला अचानक नवरदेवाला मिठी मारते; महिलेने मिठी मारताच पहा नवरीने काय केले.
लग्नाचे बरेचसे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात आणि हे व्हिडिओमध्ये बऱ्याच घटना घडतात खूप मौज मजा असते कित्येक वेळेस लग्नाच्या स्टेजवर वेगवेगळ्या प्रकारचे मनोरंजनाचे व्हिडिओ घडलेले आपण पाहिले असतील पण या बातमीमध्ये लग्नाच्या स्टेजवर असं काही घडलं की, एका तरुणीने चक्क त्या नवरदेव सोबत पहा हे काय केलं.
लग्नानंतर नवरदेव नवरीच्या नातेवाईकांसाठी रिसेप्शन ठेवलेले असते यावेळी दोघांनाही आशीर्वाद देण्यासाठी लोक येत असतात आणि अशावेळी नवरदेव आणि नवरीचे मित्र-मैत्रिणी देखील समारंभामध्ये येत असतात आणि या दोघांचा आनंद हा द्विगुणीत करीत असतात अनेक वेळा आपण पाहिले आहे की लग्नामध्ये मित्र असे काही गिफ्ट देतात की जे कायम लक्षात राहतील असाच काहीसा प्रकार एका व्हिडिओमध्ये घडला आहे आणि तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहे.
बऱ्याच वेळेस आपण पाहतो की, जेव्हा वधू आणि वरचे मित्र त्यांचे अभिनंदन करण्यासाठी येत असतात तेव्हा ते एकतर अजब भेटवस्तू आणतात नाहीतर असं काहीतरी प्रांक करतात की जो त्या वधू-वरांना आयुष्यभरासाठी लक्षात राहील असाच काहीसा प्रकार एका नवरदेव मुलासोबत घडला आहे त्याचा एक मित्र सूटबूट घालून येणे ऐवजी चक्क बुरखा घालून रिसेप्शन साठी येत आहे आणि त्यानंतर जे काही घडलं त्याने वारालाही धक्का बसला त्यासोबतच वधूलाही धक्का बसला.
सदरील व्हिडिओ मध्ये वधू वर स्टेजवर लोकांच्या शुभेच्छा स्वीकारत असतात आणि याच दरम्यान त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांमधून एक बुरखा घातलेली महिला चालत येताना दिसत आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिचा चेहराही स्पष्ट दिसत नाही ती धावतच येत असते आणि स्टेजवर येतात वराला मिठी मारते.
अचानकपणे एक महिला जेव्हा आपल्याला स्टेजवरून मिठी मारते त्यावेळेस त्या बिचार्यावरची काय अवस्था झाली असेल याबद्दल बोलायलाच नको. तो घाबरून इकडे तिकडे बघू लागतो त्यासोबत असलेली नववधू सुद्धा हा सर्व प्रकार पाहून थोडी थक्क होते. नवरदेव वेगवेगळे हावभाव करू लागतो आणि इतक्यात नवरदेव त्या महिलेच्या चेहऱ्यावरून बुरखा हाताने काढतो आणि जेव्हा चेहऱ्यावरील बुरखा हाताने काढतो त्यावेळेस ते क्षण पाहून नवरदेव आणि त्या ठिकाणी असणारे प्रत्येक जण मोठ्याने हसू लागतात कारण त्या बुरख्यामध्ये त्या नवरदेवाचा जवळचा मित्र असतो.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @Poonam_Datta नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, ज्याला पाहून युजर्स खूप विनोदही करत आहेत. हा व्हिडिओ खूप पाहिला आणि शेअर केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी शेअर केलेला व्हिडिओ 3 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे आणि सुमारे 5000 जणांनी लाइक केला आहे.