रस्ता क्रॉस करत असताना अचानक ट्रकच्या खाली गेली महिला आणि पहा तिची काय अवस्था झाली.

जेव्हा आपण घरातून बाहेर प्रवास करण्यासाठी जात असतो त्यावेळेस बऱ्याचदा आपल्याला घरातून किंवा मोठ्या माणसांकडून सांगितले जातात की, प्रवास करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूने किंवा व्यवस्थित प्रवास करा. असे सांगण्याच्या मागे कारण हे असते की, आपण जरी रस्त्याने व्यवस्थित चाललो तर समोरचा व्यवस्थित चालेलच असे नाही कित्येक वेळेस समोरच्याच्या चुकीमुळे आपल्यालाही भोग भोगावे लागतात. कित्येक वेळेस तर समोरच्याची चुकी असताना शिक्षा आपल्याला भेटत असते. असेच काही प्रसंग रस्त्याने चालत असताना आपल्याला आसपास पाहायला मिळतात किंवा आपल्या सोबत देखील घडत असतात.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की रस्त्याने जात असताना एक महिला मृत्यूच्या दारातून परत कशी आली आहे. याबद्दल आपण सविस्तर पाहू, रस्त्यावर चालताना किंवा गाडी चालवताना नेहमी सावध राहण्याचा सल्ला दिला जातो. कारण कधी आणि कसा अपघात घडेल, हे कोणीच सांगू शकत नाही. अनेकदा आपली काही चूक नसताना केवळ दुसऱ्याच्या चुकीमुळेही आपल्याला अपघाताला सामोरे जावं लागतं. मात्र काही लोकांचं नशीब अतिशय चांगलं असतं. यामुळे ते अपघातानंतरही मृत्यूच्या दारातून परत येतात. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे.
सदरील व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल की या व्यक्तीसारखं भाग्यवान कोणी नाही. व्हिडिओ हृदय पिळवटून टाकणारा आहे. जर तुम्ही रस्त्यावर चालत असाल तर तुम्हाला खूप काळजी घेणं गरजेचं आहे. रस्त्यावर रोज अपघात होत असतात. कधी कोणतं वाहन येईल आणि कोणाला धडक देईल हे कोणालाही सांगता येणार नाही. या व्हायरल व्हिडिओमध्येही आपल्याला तेच दिसत आहे.
व्हिडिओमध्ये पहिले तर लक्षात येते कि, अपघातात एक तरुणी थोडक्यात बचावली आहे. यात दिसतं की महिला पडली आणि संपूर्ण ट्रक महिलेच्या अंगावरून गेला, मात्र आश्चर्याची बाब म्हणजे तिला ओरखडाही आला नाही आणि तिचा जीव वाचला.
रस्त्याने जाताना आपण पाहतो की, रस्त्यावर जाम असताना दुचाकीस्वार आपली दुचाकी आणि स्कूटी वाहनांच्या मध्ये असलेल्या जागेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात. असाच काही प्रकार या व्हिडिओमध्ये पाहायला मिळात आहे. महिला ट्रकच्या समोरून तिची स्कूटी काढत असताना अचानक गाड्या पुढे सरकू लागतात आणि ती महिला स्कूटीसह रस्त्यावर कोसळते. यानंतर ती ट्रकखाली येते आणि संपूर्ण ट्रक तिच्या अंगावरून जातो. व्हिडिओ पाहिल्यानंतर महिलेचा जीव वाचणार नाही असं एकदा वाटतं. मात्र तरी चमत्कारिकरित्या तिचा जीव वाचला. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटले आम्हाला नक्की कळवा.