महाराष्ट्रातील तरुण नाचायला हैदराबादला गेला; नाचताना असे काही घडले कि पुन्हा आलाच नाही, पहा बातमी सविस्तर.

सोशल मीडियावर दिवसभरात वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्हायरल व्हिडीओ पहायला मिळातात. मजेशीर, भावनिक, विचित्र, धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. मात्र काकित्येक वेळेस असे काही व्हिडीओ व्हायरल होतात ज्यामध्ये अचानक लोकांचे मृत्यू झाले आहेत. अन्न खाताना, व्यायामशाळेत व्यायाम करताना किंवा नाचत असतानाही लोकांचा अचानकपने मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये आता आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे.
सध्या एक व्हायरल व्हिडीओमध्ये, अचानक एका तरुणाचा डान्स करताना जीव गेल्याचा प्रकार घडला आहे. तेलंगणामध्ये आपल्या नातेवाईकाच्या लग्नात नाचत असताना हृदयविकाराच्या झटक्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तो फक्त १९ वर्षाचा होता. ही घटना शनिवारी रात्री घडली. हैदराबादपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या पारडी गावात एका नातेवाईकाच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये हा तरुण आला होता सदरील व्हिडिओमधील तरुण महाराष्ट्राचा रहिवासी होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये हा तरुण चांगलाच सेलिब्रेशनच्या मूडमध्ये दिसत आहे आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत तो त्याच्या आवडत्या गाण्यावर डान्स करत असताना, नाचत असताना तो अचानक खाली पडला. आणि त्याच क्षणी पाहुण्यांनी त्याला रुग्णालयात नेले, तेथे नेल्यावर डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या तरुणाला हृदयविकाराचा झटका आला असावा, असे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. अचानकपणे झटका येऊन लोकांचा थेट जीव जातोय. त्यामुळे हा चिंतेचा प्रश्न झाला आहे. सध्या समोर आलेला व्हिडीओ @iShekhab नावाच्या ट्विटक अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.