अबब ! या अधिकाऱ्याला रंगेहात पकडले, पहा कोण आहे तो अधिकारी.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश कुमार बागुल असे अटक करण्यात आलेल्या अभियंताचे नाव आहे. आर के इन्फा काँट्रो प्रायव्हेट लिमिटेड फर्म मध्ये कार्यरत एका 39 वर्षीय तक्रारदारांने याप्रकरणी तक्रार दिली होती.
या फर्मला हरसुल येथील मुले मुलींच्या वस्तीगृहात सेंद्रिय किचनचे काम देण्यात आले होते, याबद्दलची निविदा मंजूर झाली होती. दोन कोटी चाळीस लाख रुपयांचा कंत्राट मिळालं होतं. किचन बांधकाम सुरू करण्याचा असल्याने कार्यारंभ आदेश हवा होता. हा आदेश मिळावा यासाठी तक्रारदार अभियंता बागुल यांच्याकडे पाठपुरावा करत होता. 19 ऑगस्ट रोजी बागुल यांना भेटण्यासाठी गेले. कार्यारंभ आदेश मिळवा अशी विनंती केली, मात्र निवेदनात रकमेच्या बारा टक्के म्हणजेच 28 लाख रुपये मागणी बागुल यांनी तक्रारदार यांच्याकडे केली.
ही सर्व माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवण्यात आली, या माहितीची शहानिशा होताच पथक नेमण्यात आलं. तो अभियंता ज्या ठिकाणी राहत आहे. त्याच कॉलनीत त्या ठिकाणी सापळा रचण्यात आला. लाच स्वीकारताना बागुल याला रंगेहात पकडण्यात आल. विभागाचे अधीक्षक सुनील कडासने, अप्पर अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अनिल बागुल, पोलीस कर्मचारी किरण अहिरराव, यांच्यासह नितीन कराड, संतोष गांगुर्डे यांनी कारवाई केली.
मुंबई नाका पोलीस स्टेशन मध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम केले जात होता. आदिवासी विकास कामातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंताला त्याच्या घरात 28 लाखांसह लाच स्वीकारताना रंगेहात पकडल. यामुळे गैरप्रकारात नेहमीच चर्चेत राहणाऱ्या आदिवासी विकास विभागाला कशा पद्धतीने भ्रष्टाचाराची कीड लागली आहे हे समोर आल.