मोठी बातमी : प्रेमप्रकरणातून नगर हादरले, मोठ्या बहिणीने तिच्या लहान बहिणीसोबत पहा काय केले.
प्रेम प्रकरणात हत्या करण ही अजून प्रथा झाली आहे , खोट्या मोठेपणा पायी अनेक चुकीच्या गोष्टी होतात , त्या प्रेमी युगालाना मारहाण ,खून करन मात्र कोपरगाव च्या घटनेत धक्कादायक घडल.प्रेम प्रकरण कुटुंबीयांना सांगितले आणि प्रियकरासोबत पळून जाण्यास विरोध केला. यात मोठ्या बहिणीने लहान बहिणीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात घडली आहे.
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील तीन चारी शिवारात ३० सप्टेंबरला आई-वडील घरी नसताना हर्षदा बानकर या १७ वर्षीय तरुणीचा मृतदेह तिच्याच घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. मात्र, हर्षदा हिची आत्महत्या नसून हत्या झाल्याचे तसेच ही हत्या तिच्याच सख्या मोठ्या बहिणीने केल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस तपासात समोर आला आहे.
मयत हर्षदाची मोठी बहीण सृष्टी बानकर, (वय वर्षे १९) हिचे आकाश कांगुणे नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. याबद्दल हर्षदा हिने कुटुंबीयांना सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी सृष्टीला समज दिली होती. तसेच काही दिवस कॉलेजला जाऊ नकोस, अशी सक्त ताकीद दिली होती. त्यामुळे सृष्टीच्या मनात हर्षदाबद्दल रागाची भावना निर्माण झाली. त्यानंतर सृष्टी ही प्रियकरासोबत पळून जाण्याचा तयारीत असल्याने हर्षदा हिने तिला तसे कृत्य करण्यास विरोध केला. सृष्टीने मागचा पुढचा कुठलाही विचार न करता ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून हर्षदाची हत्या केली. हत्येनंतर आरोपी सृष्टी ही ठरल्याप्रमाणे प्रियकरासोबत पळून गेली.
श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथून ताब्यात घेतले. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होताच मयताच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपी सृष्टी बानकर हिच्यावर कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. मात्र प्रियकरासाठी मोठ्या बहिणीने सख्ख्या लहान्या बहिणीची हत्या केल्याने संपूर्ण कुटुंबच उद्धवस्त झाले आहे.