शिर्डी स्थानकात एक्सप्रेसमध्ये आढळला मृतदेह; मृताच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीतच दडले होते रहस्य…
देशभरामध्ये शिर्डीच्या साईबाबांचा महिमा आहे, शिर्डीचे साईबाबा हे देशभरामध्ये गाजलेले आहेत, त्यामुळे साई भक्त मोठ्या प्रमाणात शिर्डीला येत असतात. त्यामुळे शिर्डीला सतत वर्दळ असते. यातच एक धक्कादायक प्रकार असा घडला कालका साईनगर एक्सप्रेस मध्ये एक मृतदेह आढळला.
रेल्वे सफाई करत असताना हा मृतदेह हाती आला, मयत व्यक्ती ही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे देखील निष्पन्न झालं ही घटना साईनगर शिर्डी रेल्वे स्थानकावर घडली. ती रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. रेल्वेची स्वच्छता करत असताना हा प्रकार समोर आला.
ही व्यक्ती हिमाचल प्रदेशातील रहिवासी असल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं, दिल्ली हून शिर्डीला येणाऱ्या रेल्वे मध्ये हा मृतदेह सापडला. महेंद्रसिंह बाबू असे त्या व्यक्ती च नाव होत. शिर्डीला येणाऱ्या रेल्वेत ही बॉडी बांधलेल्या अवस्थेत ठेवली होती म्हणून एकच खळबळ उडाली.
या मृताच्या खिशामध्ये सापडलेल्या फोटोवरुन तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे देखील निष्पन्न झाले. शिर्डी नगरपालिका रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी घटनास्थळी पोहचले. साईनगर रेल्वे पोलीस, शिर्डी नगरपालिका, शिर्डी पोलिसांच्या वतीने या घटनेचा तपास सुरू करण्यात आला. एका व्यक्तीचे रेल्वेमध्ये अशा प्रकारे मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली.