आ. बच्चू कडू यांनी उद्घाटनासाठी बोलवलेल्या कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली, Video व्हायरल.
राजकीय वर्तुळामध्ये बच्चू कडू सध्या जास्त चर्चिले जात आहेत, कारण जे मंत्रिमंडळ स्थापन झालं त्यामध्ये बच्चू कडू यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडलेली नाही. त्यामुळे ते नाराज आहेत. ते देखील अनेकदा उघडपणे सांगतात की ते नाराज आहेत त्यांना मंत्री होण्याचे एक अपेक्षा आहे. हे नवं सरकार त्यांना कुठलं मंत्रीपद देणार आहे याच्या प्रतीक्षेत ते देखील आहेत. त्यामुळे प्रहार संघटनेचे नेते आ. बच्चू कडू हे सध्या जोरदार चर्चेत आहेत , तर सध्या त्यांची नव्या एका प्रकरणाचे चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजेच एका गावामध्ये उद्घाटनासाठी गेल्यानंतर काम अत्यंत निकृष्ट दर्जाच झाला आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर त्यांनी ज्या कार्यकर्त्यांनी काम पाहण्यासाठी बोलावलं होतं त्या कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली या ठिकाणी पोलीस ही उपस्थित होते
प्रहार संघटनेत बच्चू कडू यांचे आंदोलन राज्यभर गाजलेली आहेत. एका चांगल्या कामासाठी बच्चू कडू यांचे नाव घेतलं जात, त्यामुळेच बच्चू कडूं यांनी काम निकृष्ट झालेला आहे हे त्यांच्या निदर्शात आले .शिंदे गटाचे समर्थक आमदार आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू विविध कारणांमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची चर्चा सर्वत्र असते. आज अमरावतीमध्ये कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या बच्चू कडू यांना राग अनावर झाला आणि पोलिसांसमोरच त्यांनी कार्यकर्त्याच्या कानाशिलात लगावली.
अमरावतीच्या गणोजा गावात बच्चू कडू उद्घाटनासाठी गेले होते. रस्त्याच्या कामकाजासंदर्भात कार्यकर्त्यांनी त्यांना पाहण्यासाठी बोलावले होते. यावेळी वादविवाद झाला. बच्चू कडू यांना राग अनावर, कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली. त्यामुळे बच्चू कडू पुन्हा एकदा वादग्रस्त ठरले आहेत. बच्चू कडूंचा हा व्हिडीयो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
मात्र बच्चू कडूंच्या या कृत्यामुळे त्यांचं हे कृत्य वादग्रस्त ठरू शकतात सोशल मीडियावरती याचं व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होऊ लागला यावरती अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत अगदी काही दिवसांपूर्वी हिंगोली जिल्हा देखील असाच एक प्रकार घडला होता निकृष्ट दर्जाचं अन्न वाटप केल्यामुळे एका प्रशासकीय अधिकाराच्या कानशिरा खाली आमदार संतोष बांगर यांनी लगावली होती त्यावर ती विरोधी पक्ष त्यांच्यावरती तुटून पडला होता त्यामुळे राजकीय नेत्यांनी अशा पद्धतीने कृत्य करणे यावरती अनेक आरोप आरोप केले जातात त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये बच्चू कडू यांच्या या कार्यकर्त्याच्या कांशीला खाली लगावल्याबद्दल काय प्रतिक्रिया उमटतात यातून कार्यकर्ते यांचं खचकरण होतंय का हे पाहणं फार महत्त्वाचा ठरेल.