दुखःद : 45 दिवस मिठात पुरवून ठेवला मृतदेह; मुलीला न्याय मिळावा म्हणून पाहा या बापाने काय काय केले. बातमी सविस्तर.
नंदुरबार मध्ये गेल्या 45 दिवसापासून सुरू असलेल्या एका बापाच्या लढ्याची अखेर प्रशासनाने दखल घेतली. आपल्या मुलीवरती बलात्कार झाला आहे , तिची हत्या करण्यात आली आहे ,मात्र शवविच्छेदन अहवालातून खून आणि बलात्काराची माहिती लपवली गेली, तिची आत्महत्या दाखवली गेली आहे.
पण ती माहिती चुकीची आहे, तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमांना अटक करा, माझ्या मुलीला न्याय द्या असा आक्रोश या बापाने केला. दीड महिन्यापासून पोलीस प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नव्हती, पण या बापाने हार मानली नाही त्यांनी आपल्या लढा सुरूच ठेवला.
जोपर्यंत मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत तिच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करणार नाही असं तिचा बाप म्हणाला.
या बापाने आपल्या मुलीचा मृतदेह गेल्या 45 दिवसापासून मिठात पुरून ठेवला होता. अखेर त्याच्या लढाईची दखल घेत प्रशासनानं आरोग्य पथकासह घटनास्थळी पाहणी केली आहे.
नंदुरबारच्या धडगाव तालुक्यात ही घटना घडली आहे, पीडित मुलीचे नाव हे गुपित ठेवण्यात आले आहे. वडिल म्हणाले की, आपल्या मुलीवरती बलात्कार करून तिची हत्या केली आहे. प्रशासनानं मुलीच्या मृतदेहाच शवविच्छेदन केलं, मात्र त्यामध्ये चुकीची माहिती आली. आपल्या मुलीला न्याय मिळावा यासाठी लढा सुरु ठेवला आहे.
या मृतदेहाचे शवविच्छेदन मुंबईत केल जावा अशी मागणी केली जाते. मागणीला गावकऱ्यांचे देखील समर्थन आहे. त्यामुळे प्रशासन व पोलिसांनी त्यांच्या मागणीची दखल घेत. कुटुंबीयांच्या मागणीनुसार मृतदेहाचं पुन्हा एकदा शवविच्छेदन केल जाणार आहे, मुलीच्या मृतदेहावरती मुंबईच्या जे जे रुग्णालयात पुन्हा शवविच्छेदन केल जाणार आहे.
अशाप्रकारे ४५ दिवस सोबत ठेवून नंतर शवविच्छेदन करिता मुंबईला पाठवणार अशी ही मोठी आणि पहिलीच घटना घडली आहे, मात्र आपल्या मुलीला न्याय मिळावा म्हणून या बापाला मोठा संघर्ष करावा लागला आहे.