लाजिरवाणा व्हिडिओ व्हायरल; जेसीबीला गायीचे पाय बांधून नंतर पहा त्या गाईसोबत काय केले.

हिंदू धर्मामध्ये गाईला महत्वाचे स्थान आहे. हिंदू धर्मात गाईला आईचे स्थान देखील दिले जाते. मात्र या बातमीमध्ये याच गाईला कशा पद्धतीने कृरतेने रस्त्याने ओढत नेताना एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा लाजिरवाणा प्रकार पाहून नेटकरी चांगलेच संतापलेले पाहायला मिळत आहेत. युजर्सने प्रचंड राग व्यक्त करत जे दोषी आहेत यांच्यावर सर्वात कडक कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे. माणुसकीला लाजवेल असा हा व्हिडिओ अनेकांचे लक्ष वेधताना दिसत आहे. हिंदू धर्मामध्ये गाय पूजनीय आहे, आणि या व्हिडिओमुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत असं बोललं जात आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक हिंदू संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सदरील घटना ही मध्य प्रदेश येथील सतना जिल्ह्यामधील आहे. या ठिकाणी शहराच्या बाहेर एका धाब्याजवळ गाईचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या धाब्याच्या मालकाने त्या गाईचा मृतदेह काढण्यासाठी जेसीबी बोलावला. तसेच जेसीबीच्या सहाय्याने या गाईचे मृतदेह फरफटत नेला आणि धाब्यापासून लांब ठिकाणी फेकण्यात आला. या गाईवर असे क्रूर कृत्य घडत असताना त्या ठिकाणाहून जाणाऱ्या एका कारचालकाने हा व्हिडिओ त्याच्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केला आहे. यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की, गाईचे दोन्ही पाय जेसीबीला बांधून रस्त्यावर ओढली जात आहे.
याबाबतची माहिती मिळतात घटनास्थळी पोलीस अधीक्षक व महापालिकेचे आयुक्त यांनी धाव घेतली. त्याचप्रमाणे ढाबा मालक व जेसीबी चालक या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. यामध्ये पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ढाब्याचे मालक अटल सिंग हे म्हणाले की या मृत गाईवर मोठ्या प्रमाणामध्ये माशांचे साम्राज्य होते. आणि याचमुळे कोणीही हा मृतदेह टाकण्यासाठी तयार होत नव्हते आणि म्हणून मला जेसीबी बोलवावा लागला.
गोमातेला अशाप्रकारे रस्त्यावरून ओढून नेत असताना त्याचा व्हिडिओ समोर आल्यामुळे हिंदू संघटना आणि गोसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. व या घटनेबद्दल सर्वजण खेद व्यक्त करत आहेत. सदरील व्हिडिओ हा राकेश कुमार पटेल नावाच्या ट्विटर अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे.