प्रियकराच्या पत्नीलाच मागितली लग्नासाठी परवानगी; अन् पहा पुढे काय घडलं ? फोटो होत आहे व्हायरल..

ना कधी असं घडलं ना कधी असे घडेल, मात्र या बातमीत असं घडलं आहे. प्रेम आणि लग्नाच्या अनेक गोष्टी, अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. मात्र एक वेगळीच घटना समोर आली आहे. ही घटना वाचून तुम्हाला थोडी फिल्मी वाटेल, मात्र हे सत्यात घडले आहे. एखाद्या चित्रपटाप्रमाणे एका पत्नीने आपल्या पतीचं लग्न त्याच्या आधीच्या प्रियसी सोबत लावल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच विवाह सोहळा दरम्यान पत्नी ही त्यावेळी उपस्थित होती.
इतकंच नव्हे तर ते तिघेही एकाच घरात, एकाच छताखाली राहणार आहेत. हि एका लग्नाची दुसरी गोष्ट आहे अस म्हणायला काही हरकत नाही. आंध्र प्रदेश मधील तिरुपती येथील डकली येथील आंबेडकर नगर या ठिकाणी कल्याण हा युट्युब आणि शेअर चॅट वरती खूप फेमस असणारा तरुण राहत होता. काही वर्षांपूर्वी कल्याणची भेट विमला सोबत झाली, त्यानंतर हळूहळू त्यांची मैत्रीचे रुपांतर प्रेमात झालं नंतर लग्न केलं.
तसेच कल्याण आणि विमला सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवू लागले. काही दिवसानंतर या दोघांच्या नात्यांमध्ये तडा जाऊ लागला, कारण या प्रकरणात विशाखापट्टणम इथली नित्यश्री या मुलीची एन्ट्री झाली होती. कल्याण आणि नित्याश्री यांच्यामध्ये जुने प्रेम संबंध होते. काही दिवसांपूर्वीच त्यांचं नातं तुटलं होतं. त्यानंतर कल्याणने विमला सोबत लग्न केलं. मात्र जेव्हा नित्याला या लग्नाची गोष्ट कळाली तेव्हा ती त्याच्या घरी पोहोचली.
नित्याश्री ने त्याची धर्मपत्नी विमला तिच्याकडून लग्नासाठी परवानगी मागितली. सुरुवातीला विमला यांनी लग्नाला नकार दिला मात्र त्या दोघांनीही सर्वकाही समजावून सांगितलं आणि पुन्हा प्रस्ताव मांडला. आपण तिघे एकत्र राहू असेही ते म्हणाले त्यामुळे सर्व विचार करून कल्याण ची पत्नी विमला हिने या लग्नाला परवानगी दिली. आणि वाजत गाजत पारंपारिक पद्धतीने तिने आपल्या नवऱ्याचं त्याच्या प्रियसी सोबत लग्न लावून दिला. आणि त्यावेळी या तिघांनी एक फोटो काढला हाच फोटो सध्या सोशल मीडियावरती धुमाकूळ घालतो आहे. पती पत्नी और वो नकारात्मक असं हे चित्र जेव्हा रेखाटलं जातं तेव्हा कुठेतरी सकारात्मक असं काहीतरी घडत असताना एखाद्या खऱ्याखोऱ्या कथेचा हॅपी एंडिंग झालेला पाहायला मिळतो.