सत्ताधाऱ्यांची दडपशाही उघड! प्रभाग १५ मध्ये गुंडागर्दीचा कहर; उमेदवार सुवर्णा जाधव यांच्या मुलावर जिवघेणा हल्ला.

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होताच सत्ताधाऱ्यांची दडपशाही, प्रशासनाचा गैरवापर आणि गुंडागर्दी उघडपणे सुरू असल्याचा संतापजनक प्रकार पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक १५ मध्ये समोर आला आहे. शिवसेना ( शिंदे गट ) उमेदवार सुवर्णा दत्ता जाधव यांच्या कुटुंबीयांना निवडणूक जाहीर झाल्यापासून मुद्दाम लक्ष्य केले जात आहे.

प्रशासनाकडून सातत्याने अडचणी निर्माण केल्या जात असून, विरोधकांच्या दबावाखाली कारवाया केल्या जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. या सगळ्याचा कळस म्हणजे शिवसेना नेते जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे यांच्याकडे धाड टाकण्यात आली, ते हृदयविकाराच्या झटक्यामुळे रुग्णालयात उपचार घेत असताना, दुसरीकडे जाधव कुटुंबीयांवर मारहाणीच्या घटनांची मालिका सुरू राहिली.
दरम्यान, प्रतिस्पर्धी विरोधकांनी सुवर्णा जाधव यांच्या मुलाला एकट्यात गाठून अमानुष मारहाण केली. या हल्ल्यात अभिषेक दळवी हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्या संपूर्ण शरीरावर मुका माराचे खोल घाव आहेत. तो रक्तभंबाळ अवस्थेत रुग्णालयात दाखल असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. हा प्रकार पाहता हा साधा वाद नसून निवडणुकीत दहशत निर्माण करण्याचा उघड प्रयत्न असल्याचे स्पष्ट होत आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, पंधरा दिवसांपूर्वीच जाधव कुटुंबीयांनी लेखी स्वरूपात प्रशासनाला कळवले होते की आमच्या कुटुंबीयांच्या जीविताला धोका आहे. तरीही कोणतीही सुरक्षा देण्यात आली नाही. आता तर परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. जखमी असतानाही पोलीस प्रशासन तक्रार दाखल करून घेण्यास तयार नाही.
➡️ गेल्या तब्बल 4 तासांपासून जाधव कुटुंबीय कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये न्यायाच्या प्रतीक्षेत ठाण मांडून बसले आहेत.
हा प्रकार म्हणजे,
❓ पोलीस प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे का?
❓ जखमींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे का?
❓ न्याय मागणाऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये तासन्तास बसवणे हीच का कायदा-सुव्यवस्था ?
निवडणुकीच्या काळात विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी जर मारहाण, धमक्या आणि पोलिसी दुर्लक्षाचा वापर होत असेल, तर ही लोकशाही नसून दहशतीचे राज्य असल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र होत आहे.
➡️ दोषींवर तात्काळ कठोर कारवाई व्हावी
➡️ जखमींची तक्रार त्वरित नोंदवावी
➡️ जाधव कुटुंबीयांना पोलीस संरक्षण द्यावे
➡️ निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करणाऱ्यांवर कारवाई करावी
अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.



