विनापरवाना म्हशीचा वाहतूक करणारे फर्दापूर पोलिसांची ताब्यात पहा बातमी सविस्तर.
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
ट्रक मधून १४ म्हशींची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या तिघांविरुद्ध मंगळवारी फर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फर्दापूर येथील औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील महावितरणाच्या वीज उपकेंद्राजवळ फर्दापूर पोलिसांच्या पथकाने ही कार्यवाही केली असून तिघांना ताब्यात घेऊन १४ म्हशी व आयशर ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे
सलमान खान उस्मान खान कादिर शेख आयुब कुरेशी दोघे राहणार सावदा तालुका रावेर व सईद शेख रशीद राहणार खैरोती, बाजार ब्राह्मणपुर असे गुन्हा दाखल कारण नावे आहेत एका आयशर ट्रक द्वारे विनापरवाना जनावरांची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती फर्दापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांना प्राप्त झाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील फर्दापूर येथील महावितरणच्या २० उप केंद्राजवळ ट्रकची एम एच ०४ जीएफ ३६३४ तपासणी केली असता १४ म्हशींची अत्यंत दमदाटीने दोरीच्या साह्याने बांधून त्यांची वाहतूक केली जात असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी ट्रक मधील व्यक्तींकडे म्हशीची वाहतूक करण्यासाठी लागणारा परवाना व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणी दाखल्याची माहिती केली असता त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले या पार्श्वभूमीवर पोलिसांनी 14 म्हशीसह ट्रक जप्त केला असून पोलीस कॉन्स्टेबल सतीश नारायण हिवाळे यांच्या फिर्यादी वरून फर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस नाईक निलेश लोखंडे पुढील तपास करत आहेत