तुम्ही कधी किंग कोब्राला अंघोळ घालताना पहिली आहे का ? पहा हा व्हिडीओ होतोय व्हायरल.

नुसते नाव जरी ऐकले तरी कित्येकांना घाम फुटतो ते नाव म्हणजे साप ! साप पाहून चांगल्या चांगल्या लोकांची घाबरगुंडी होते. पण सध्या एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर रोज प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात साप, नाग किंवा किंग कोब्राचे व्हिडिओदेखील असतात. बऱ्याचदा अशा व्हिडिओत आपण एखाद्या ठिकाणी विषारी साप, नाग किंवा किंग कोब्रा आढळल्याचं बघतो. काही वेळा साप, नागाच्या विषावर प्रयोग करणाऱ्या निरनिराळ्या प्रयोगशाळांमधले व्हिडिओदेखील व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर किंग कोब्राशी संबंधित जरा वेगळाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आश्चर्यचकित करणारा आहे.
किंग कोब्रा अतिशय विषारी साप आहे त्याने जर एखाद्या माणसाला किंवा प्राण्याला चावा घेतला तर अगदी काही मिनिटात त्याचा मृत्यू होतो. या व्हिडिओत एक व्यक्ती किंग कोब्राला चक्क थंड पाण्याने आंघोळ घालताना दिसत आहे. साप किंवा नाग उन्हाळ्याच्या दिवसांत थंड ठिकाणी तर थंडीच्या दिवसात उबदार ठिकाणी लपलेला असतो.किंग कोब्रा हा सर्वांत विषारी सर्प मानला जातो. किंग कोब्रा एखाद्या कोपऱ्यात दडलेला असल्याचे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील; पण सध्या किंग कोब्राचा एक हटके व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती चक्क किंग कोब्राला थंड पाण्याने आंघोळ घालत आहे. विशेष म्हणजे आंघोळ घालणाऱ्या व्यक्तीवर तो एकदाही हल्ला करताना दिसत नाही.
किंग कोब्राचा हा व्हिडिओ @Gulzar_sahab नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘एवढ्या थंडीत बिचाऱ्या सापाला थंड पाण्याने आंघोळ घालतोय,’ या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असं लिहिलं आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 26 हजारांहून अधिक लोकांनी पहिला आहे. बाथरूममध्ये असलेल्या एका व्यक्तीने हे आश्चर्यकारक दृश्य कॅमेरात कैद आहे. हा व्यक्ती त्याला न घाबरता बाथरूममध्ये आंघोळ घालत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये, एका बाथरूममध्ये एक महाकाय किंग कोब्रा आहे आणि एक व्यक्ती हातात मग घेऊन थंड पाण्याने किंग कोब्राला आंघोळ घालत आहे. विशेष म्हणजे आंघोळ सुरू असताना किंग कोब्रा त्या व्यक्तीवर हल्ला करत नाही. एकदा कोब्रा आपला फणा त्या व्यक्तीच्या हातातला मगकडे नेतो; पण ती व्यक्ती मगच्या सहाय्याने कोब्राला बाजूला करते आणि हाताने त्याला पुन्हा आंघोळ घालण्यास सुरुवात करते, असं दृश्य दिसतं. या दृश्यावर सुरुवातीला कोणाचा विश्वासदेखील बसत नाही; मात्र हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत असून, चर्चेचा विषय ठरला आहे.