गुन्हेगारी

पोटच्या 16 महिन्याच्या मुलीवर तिच्या कुटुंबातूनच झाला अत्याचार क्रूरकर्मा आई – बापाला फाशीची शिक्षा.

मयत अल्पवयीन निर्भया जीचे वय सोळा महिने आहे तिच्यावर तिच्या जन्म पित्यानेच 3 जानेवारी 2022 ला पहाटे चारच्या दरम्यान राहत्या घरी अत्याचार गेले.
16 महिन्याच्या मुलीवर अनैसर्गिक पणे अत्याचार करणाऱ्या बापाला व त्या बापाला साथ देणार्‍या आईला सोलापूरच्या विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. दोलाराम अर्जुन राम वय वर्ष 26 तर त्याची बायको कुमारी वय 20 राहणार हैदराबाद तेलंगणा मुळगाव राजस्थान यांना शारीरिक अत्याचार व कोणाच्या अपराधाबद्दल दोशी ठरवण्यात आले आहे.

आता पाहूया नेमके प्रकरण आहे तरी काय ?
क्रूरकर्मा बापाने आपल्या 16 महिन्याच्या मुलीला दारू पाजली व तिच्यावर नैसर्गिक आणि नैसर्गिक पद्धतीने लैंगिक अत्याचार केले. तसेच मौखिक लैंगिक अत्याचार पण करण्यात आला करत असताना त्या चिमुकलीला अतोनात वेदना होत होत्या आणि वेदना होत असल्याने ती सारखी रडत होती. तिचा आवाज बंद करण्यासाठी त्या चिमुकलीचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळला. आणि खून करण्यात आला विशेष म्हणजे या घटनेची कुणालाही कल्पना न देता चिमुकलीच्या मृतदेहाची विल्हेवाट सुद्धा लावली आणि कुठलाही पुरावा सापडणार नाही अशा उद्देशाने तो मृतदेह सिकंदराबादहून घेऊन सोलापूर मार्गे राजस्थान येथे घेऊन जात होते, पण सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेस जात असताना त्यांच्यासोबत असलेल्या प्रवाशांना या दोघांवर संशय आला आणि त्या सोबतच्या प्रवास यांनी याबाबतची माहिती रेल्वे पोलिसांना दिली.

त्यांना वाडी रेल्वे स्टेशनला उपस्थित केली असता स्टेशन मास्तर यांनी डॉक्टर व पोलीस उपलब्ध न झाल्याने सदरची तक्रार सोलापूर रेल्वे स्टेशन येथे पाठवण्यात आली. त्यानंतर सोलापूर रेल्वे स्टेशन यांनी ही माहिती सोलापूर लोहमार्ग पोलीस यांना कळवली आणि त्यानंतर डॉक्टरांना पाचारण केले गेले पोलिसांनी सदर आरोपी कडून मृतदेहाला खाली उतरून डॉक्टरांकडे तपासणी केली त्यानंतर डॉक्टरांनी ती मयत असल्याचे जाहीर केले घटनास्थळाचा पंचनामा केला गेला व शवविच्छेदनासाठी मृतदेह हॉस्पिटल येथे पाठवून दिलं.

दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून कसून चौकशी केली गेली झाल्यानंतर डॉक्टरांकडून असा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला की मुलीवर अत्याचार केले मुलीवर नैसर्गिक अनैसर्गिक असे शारीरिक लैंगिक अत्याचार केला गेला व त्यानंतर तिचा गळा आवळून खून करण्यात आला त्यानंतर सदर प्रकरणी 16 महिन्याच्या अल्पवयीन मुलीला दारूपासून नैसर्गिक अनैसर्गिक मौखिक लैंगिक अत्याचार करून तिचा ओढणीने गळा आवळून खून केला गेला असल्याने आरोपींना फाशी देण्यात यावी अशी मागणी सरकारी पक्षाच्या वतीने केली गेली जिल्हा विशेष न्यायालयाने या प्रकरणावर फाशीची शिक्षा सुनावली.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Back to top button

Share this news instead of copying!