शाळेत जायचे नाही म्हणून पहा या मुलाने काय केले; व्हिडियो होतोय व्हायरल एकदा पहाच…
अनेकदा शाळेत जायचा मुल कंटाळा करत असतात आणि त्यांना मनवावं लागतं मात्र काही वेळा हट्टी आणि जिद्दी असणारी मुलं काही केल्या ऐकत नाहीत एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला देखील आपल्या शाळेचे दिवस आठवतात कारण शाळेत जायचं कंटाळा येत होता दिवशी मुलं काही ना काही बहाना शोधत असतात मात्र काहीच बहाणे मिळाल्या नंतर मिळाले नाही तर ते तसेच तोंड फुगवून का होईना पण शाळेत जातात असाच एक पट्टा शाळेत चाललाय मात्र पुढे घरातले व्यक्ती स्कुटी चालवत आहेत आणि हा गडी त्या स्कुटी वरती दोन्हीकडे पाय करून न बसता चक्क मांडी घालून बसला निवांत अगदी मांडी घालून बसलेला याला बघून अनेकांना आपले शाळेचे दिवस आठवले,
शाळेत जाण्यासाठी आपण कशा पद्धतीने वाहने करत होतो आणि त्यानंतर आपल्याला कसं सामोरे जावे लागत होतं याची प्रचितीशाळेत न जाण्यासाठी हट्ट धरलेल्या मुलांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर देखील पहायला मिळतात. या व्हिडिओंमधील लहान मुलांचा निरागसपणा आणि खोडकरपणा बघून अनेकांना हसू आवरत नाही. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक आई आपल्या मुलाला स्कूटीवर बसून शाळेत घेऊन जाताना दिसत आहे. पण, गाडीवर चिडलेल्या मुलानं असं कृत्य केलं की, जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
शाळेत जाण्यापासून सुटका मिळावी यासाठी मुलं विविध युक्त्या करताना दिसतात. या युक्त्या बघून पालकही आश्चर्यचकित होतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील मुलगाही शाळेत जाण्यासाठी इच्छुक नाही.व्हिडिओमध्ये एक आई आपल्या मुलाला स्कूटीवर घेऊन जाताना दिसत आहे. या मुलानं शाळेचा ड्रेस घातलेला आहे आणि त्याच्या खांद्यावर शाळेची बॅगही लटकवलेली आहे. गाडीवर बसलेला मुलगा खूपच उदास दिसत आहे. व्हिडिओ पाहून अंदाज बांधता येतो की, त्याला शाळेत जाण्याची इच्छा नाही पण, त्याची आई त्याला जबरदस्ती शाळेत घेऊन जात आहे.
स्कूटीच्या मागच्या सीटवर हा रुसलेला मुलगा मांडी घालून बसलेला दिसत आहे. जे पाहून युजर्सही घाबरले आहेत. कारण, स्कूटीवरील मुलाचा थोडासा जरी तोल बिघडला तर तो खालू पडू शकतो. या व्हिडिओला आतापर्यंत पाच लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर, दोन लाखांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे. व्हिडिओ पाहणारे युजर्स त्यावर कमेंट करून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.आजकाल अनेक पालक, विशेषत: मुलांच्या आया त्यांना शाळेत सोडवायला जाताना स्कूटीसारख्या मोपेड गाड्यांचा वापर करतात. बहुतेक मुलं समोर लेगस्पेसमध्ये उभी राहतात किंवा मागे बसतात. अशावेळी गाडी चावलताना पालकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे.