नगर ( झेंडीगेट ) ब्रेकिंग : तलवार, कोयदा लाकडी दांडक्याने युवकाची हत्या करण्याचा प्रयत्न.
नगर शहरातील झेंडीगेट असं म्हटलं तरी थरकाप अंगावरती आणणारा हा पूर्वीचा झेंडीगेट, पुन्हा एकदा या ठिकाणी खून मारामारी च्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. युवकावरती तलवार, कोयता, लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिघांना तोफखाना पोलिसांनी अटक केली हे तीनही आरोपी झेंडीगेट या भागातील असल्याची माहिती पुढे त्या आरोपींची नाव आहेत.
सहा जून रोजी फाशी एजाज शेख या युवकाला अकरा ते बारा जणांनी मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला उपचारादरम्यान पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला त्यावेळी 11 ते 12 जणांविरुद्ध तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून ११ ते १२ जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कराचीनगर जाणाऱ्या रोडवरील हुंडेकरी पार्किंगजवळ ही घटना घडली होती. हाशिर व त्याचे चुलते मारूफ रियाज शेख (रा. पंचपीर चावडी, अहमदनगर) यांच्यामध्ये सुमारे तीन वर्षांपासून घराचे जागेवरून वाद आहेत. ३ जून रोजी हाशिर यांच्या वडिलांचा व मारूफ यांचा एका वलिमा कार्यक्रमात वाद झाला होता. ६ जून रोजी रात्री साडेदहा वाजता हाशिर याला ११ ते १२ जणांनी कराचीनगर रोडवर हुंडेकरी पार्किंगजवळ तलवार, कोयता, चॉपर, लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विश्वास भान्सी, उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांच्या पथकाने आरोपींना अटक केली. या गुन्ह्यातील इतर आरोपी पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेतं