राहुल द्रविडच्या या कृतीचे फोटो चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि त्याच्या कौतुक देखील केले आहे.
गेल्या ३ दिवसांपासून नागपूरमध्ये जोरदार पाऊस झाला होता. काल म्हणजेच मॅचच्या दिवशी पाऊस झाला नसला तरी मैदान सुखले नव्हते. अडीच तास उशीराने सामना सुरू झाल्याने षटक कमी करण्यात आली आणि टी-२० ऐवजी टी-८ ची झाली.कर्णधार रोहित शर्माने २० चेंडूत नाबाद ४६ धावा केल्या. तर दिनेश कार्तिकने दोन चेंडूत षटकार आणि चौकार मारून मॅच संपली. मॅचनंतर खेळाडूंचे सर्वजण कौतुक करत असताना मैदानावर अशी एक गोष्ट घडली ज्याचा कोणी विचार केला नाही.
ज्या मैदानावर ही लढत झाली ते मैदान ओल होत आणि सामन्यासाठी ते सुकवण्याची कामगिरी ग्राऊंड्स यांनी केली. ज्यांच्या अथक परिश्रम आणि कष्टामुळे ही मॅच झाली त्यांना सर्वजण विसरले. पण भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य कोच आणि माजी कर्णधार राहुल द्रविड यांनी मात्र ही गोष्ट विसरली नाही. सामना झाल्यावर द्रविड यांनी स्वत:हून ग्राऊंड्समनची भेट घेतली आणि त्यांचे कौतुक केले. द्रविडच्या या कृतीने त्यांनी सर्वांची मन जिंकली , जावयाने सासरवरील विशेष प्रेम दाखवण्याची संधी सोडली नाही अश्या अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत .
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी टी-२० लढत नागपुरमध्ये झाली. पावसाच्या अडथळ्यामुळे ही लढत प्रत्येकी ८ षटकांची झाली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीकरत भारताला ९१ धावांचे आव्हान दिले होते जे टीम इंडियाने ४ चेंडू आणि ६ विकेट राखून पार केले. या विजयासह भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी देखील केली.