परिचारिका सुमन म्हात्रे व पुनम गाडेकर यांचे लसीकरणांचे कार्य गौरवपूर्ण – ऊर्मिला ठाकरे
खामगांव,:: दिनांक 08/09/2022 रोजी सामान्य रुग्णालय खामगांव येथे कोरोना महामारी कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये ज्यांनी अतिउत्तम कार्य केले,अशा निवडक परिचारिका सौ.सुमन म्हात्रे व सौ.पूनम गाडेकर यांच्या कार्याचा सन्मानसोहळा अधिपरिसेविका (मेट्रन) सौ. पार्वती बोरोकार व सहा. अधिपरिसेविका (सहा.मेट्रन)सौ. सरला झोडपे/पजई यांच्या प्रमुख उपस्थितीत खामगांव स्थित शिक्षण विस्तार अधिकारी, साहित्यिक तथा समाजसेविका वनश्री ऊर्मिला श्रीकृष्णराव ठाकरे यांचे शुभहस्ते पार पडला.
सुरुवातीला माॅ जिजाऊ व
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक परिचारिका सौ.शितल बावनकुळे यांनी केले.तद्नंतर ऊर्मिला ठाकरे यांनी आपल्या भाषणात सौ पूनम गाडेकर व सौ सुमन म्हात्रे यांच्या कार्याविषयी प्रकाश टाकला.यांचे कार्य अति उत्तम असल्यामुळे मा.प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली व प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन केले आहे.अशा गौरवशाली परिचारिका यांचा सन्मान करतांना मला अभिमान वाटतो, असे मत ऊर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केले.
क़मश:सौ पार्वती बोरोकार व सौ सरला झोडपे यांनीही सौ. सुमन म्हात्रे व पूनम गाडेकर यांचे कौतुक करून अभिनंदन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मनोज पानझाडे व नितीन इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. अर्चना सोनोने यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक कर्मचारी व परिचारिका,
परिचारक आदींनी.. परिश्रम घेतले.
ऊर्मिला श्रीकृष्णराव ठाकरे
मो.नंबर 9850872797