नवरात्र उपवासासाठी आणलेल्या भगरीतून झाली विषबाधा; तब्बल ‘एवढा’ लोकांना झाली पिठातून विषबाधा
करंजी : सध्या सगळीकडे नवरात्र उत्सव चालू आहे. नवरात्र उपवासासाठी फराळाची भरपूर प्रमाणात मागणीदेखील वाढली आहे. यामध्ये शाबूदाणा, खजूर, राजगिरा, भगर इ. पण अश्याच उपवासाच्या एका पदार्थातून विषबाधा झाली आहे. नवरात्रीच्या उपवासात खालेल्या भगरीच्या भाकरीतून करंजीसह लगतच्या गावातील जवळजवळ १५ जणांना विषबाधा झाली आहे. सोमवारी रात्री विषबाधेचा हा प्रकार घडला आहे. गावातीलच किराणा दुकानातून भगरीचे पीठ खरेदी करण्यात आल्याचे सांगत त्यातूनच विषबाधा झाल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे.
दरम्यान या मध्ये समोर आलेली माहिती अशी आहे कि, ज्या-ज्या लोकांनी या दुकानातून पीठ खरेदी केले आहे, त्यांनाही त्रास होत असल्याचे समजले आहे. करंजी येथील प्रकाश गोवर्धन राठोड, लिलाबाई लक्ष्मण चव्हाण, अनिता प्रकाश राठोड, रामदास रावजी चव्हाण, गीताबाई रामदास चव्हाण, अशोक तारू चव्हाण, सुशीला अशोक चव्हाण, रमेश संतोष चव्हाण या आठ जणांवर तिसगाव येथील श्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
करंजीसह परिसरातील नवरात्रीच्या उत्साहाचे वातावरण आहे तसेच येथील अनेक महिला – पुरुषांनी नवरात्रीचे उपवास धरले आहेत. उपवासाच्या पहिल्याच दिवशी गावातील काही महिलांनी करंजी येथील एका किराणा दुकानातून भगरीचे पीठ आणले होते. रात्री या पिठापासून भाकरी तयार केल्या असता या भाकरी खाल्ल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास काही लोकांना उलट्या, जुलाबाचा त्रास होऊ लागला. घरातील इतरांनी त्यांना तात्काळ तिसगाव येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. भगरीच्या पिठामुळे करंजीसह परिसरातील खंडोबावाडी, मराठवाडी येथील काही लोकांना त्रास झाला असून नगर येथील खाजगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे समजते.
यासंबंधी करंजीतील जवळपास 15 लोकांना भगरीच्या भाकरीतून विषबाधा झाली आहे. हे पीठ तयार करणाऱ्या कंपनीचा शोध घेऊन गुन्हा दाखल करून रुग्णांना न्याय द्यावा, अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून केली जात आहे. यामध्ये ऐन नवरात्रीत अश्या घटना घडत आहेत. आणि यामध्ये असे काही निदर्शनात येत आहे कि काही कंपन्या नवरात्रीच्या सणाची संधी पाहून आपला खराब झालेला माल विकायचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आपणही खाद्य पदार्थ खरेदी करताना त्याबाबतचा मालाचा तपशील पाहूनच खरेदी करावी.