Positive News : ” सुजलग्राम ” फुलवणाऱ्या शिक्षिकेची पहा काय आहे कहाणी.
आपल्या धकाधकीच्या जीवनात एक दिवस तरी निवांत शांत निसर्गाच्या सानिध्यात असावा असे अनेकांना वाटत असते,त्यासाठी अनेक जण नवनवीन ठिकाण शोधात असतात, शहराच्या गर्दीपासून प्रदूषण मुक्त ठिकाणी थोडी विश्रांती घेण्यासाठी अनेकांना जावस वाटत, यासाठीच एका शिक्षिकेने डोंगराळ भागात पाण्यातील खडकावर सुंदर बेट फुलवल आहे.
सौ. सुप्रिया भुजबळ या शिक्षिका म्हणून नोकरी करत होत्या, मात्र त्यांचं मन नोकरीत रमेना, स्वतचं काही तरी व्यवसाय करावा अस त्यांना वाटत होत, म्हणून त्यांनी नोकरी सोडली.मुळा धरणाच्या मागील बाजूला थोडी डोंगराळ भागात शेत विकत घेऊन सुरुवातीला शेती केली, फळ भाज्या पिकवल्या.अनेक जण ही शेती पाहायला येऊं लागले. पाण्याच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जाण्यासाठी मोठ्या होडीची सोय करण्यात आली आहे. नंतर या शेतीच त्यांनी गार्डन केलं,यात लहान मुलासाठी स्विमिंग पूल , गेम असे अनेक गोष्टी ठेवल्या.सुप्रिया ताईनी याकडे व्यवसाय म्हणून पाहण्यास सुरुवात केली,इथे अनेक गोष्टी तयार केल्या.
गेल्या १२वर्षा पूर्वी सुरू केला हा प्रवास आता रिसॉर्ट पर्यंत आला आहे. आपल कुटुंब सांभाळत त्या सुजलग्राम ला तेवढाच वेळ देतात, कुटुंबात पती,दोन मुली ,एक मुलगा असा परिवार आहे. मुलांचे शिक्षण घर – संसार सांभाळत त्या हे सुजलग्राम ही सांभाळतात.इथे येणाऱ्या सर्वांची त्या आपल्या पाहुण्या मंडळी सारखी काळजी घेतात. शाळकरी विद्यार्थी सोबत त्या खूप आपुलकीने वागतात कारण पूर्वीचा शिक्षिकेचा पेशा असल्यामुळे मुलांना काही गोष्टी ज्ञान देतात.
नगर मनमाड रोड मुळा ड्याम फाटा इथूनच आपण सुजलग्राम जाऊ शकतो, डोंगरात असणाऱ्या या सुंदर बेटाला भेट देऊ शकतात,इथे पिकवलेल्या भाज्या इथल्या जेवणात असतात त्यामुळे त्या जेवणाची चव स्वादिष्ट असते.