आंदोलन करत तिने कपडे उतरवले ; अर्ध नग्न होऊन म्हणाली…
गेल्या अनेक वर्षांपासून इराणमधील महिलांवर पोलिसांकडून विविध मार्गांनी अत्याचार, अन्याय होत आहेत. इस्लामी नियमांनुसार कपडे घालण्याची सक्ती केली जात आहे. नियमांचा भंग करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जात आहे. कपड्यांवरील नियमांचा भंग केल्यामुळे २२ वर्षांच्या महसा अमिनी हिला १६ सप्टेंबरला तेहरानमधून पोलिसांनी अटक केली. त्यानंतर तीन दिवसांनी ती मृत झाल्याचं जाहीर करण्यात आलं,या मोहिमेअंतर्गंत इराणमधील महिलांनी त्यांचा हिजाब जाळत निषेध व्यक्त केला आहे.
त्या व्हिडिओमध्ये एलनाजनं संपूर्ण अंग झाकणारा काळ्या रंगाचा बुरखा घातलेला दिसत आहे. परंतु त्यानंतर एकएक करत अंगावरचे कपडे उतरवताना ती या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या कृतीमधून एलनाजनं इराणमध्ये पोलीस करत असलेल्या दडपशाहीला विरोध व्यक्त केला. हा व्हिडिओ शेअर करताना तिनं एक पोस्ट लिहिली. पोस्टमध्ये तिनं म्हटलं की, ‘प्रत्येक महिला, मग ती जगभरातील कुठल्याही देशातमध्ये असो. तिला तिच्या इच्छेनुसार कपडे घालण्याचा हक्क असलाच पाहिजे. कोणत्याही पुरुषाला अथवा दुसऱ्या महिलेला देखील तिला नावं ठेवण्याचा, तिला जाब विचारण्याचा अधिकार नाही.’
प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. त्याचा आदर, सन्मान राखला गेला पाहिजे. लोकशाहीचा अर्थ निर्णय घेण्याची शक्ती असा आहे. प्रत्येक महिलेला त्यांच्या शरीराबद्दलचा निर्णय घेण्याचा अधिकार असलाच पाहिजे. या व्हिडिओमधून मी नग्नतेचा पुरस्कार करत नाही तर व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करते आहे.’ एलनाजनं अभिनयाच्या क्षेत्रात येण्याआधी १० वर्ष मॉडेलिंग क्षेत्रात काम केलं आहे.
दरम्यान, हा मृत्यू नैसर्गिक नसून तिच्या डोक्यावर प्रहार करून तिचा खून करण्यात आल्याचा आरोप तिथले मानवतावादी कार्यकर्ते करत आहेत. त्यानंतर इराणमध्ये पोलिसांच्या अत्याचाराविरोधात मोहिम सुरू झाली आहे. या मोहिमेअंतर्गंत इराणमधील महिलांनी त्यांचा हिजाब जाळत निषेध व्यक्त केला आहे.