4 वेळा त्या UPSC परीक्षा मध्ये नापास झाल्या, ” पुरे हा नाद ” म्हणत अपेक्षा सोडल्या, पण पाचव्या प्रयत्नात…
आपल्या जीवनात अपयश जास्त आलं तर आपण खचून जातो, आपल्याला अपयश नको असतं मात्र अपयशातच यश लपलेल असतं. एका चांगल्या यशाची सुरुवात ही अपयशापासून होते. अपयशातून जे यश मिळतं त्या यशाची चमक काही वेगळीच असते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2021 च्या परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या छाया सिंह यांची ही प्रेरणादायी कहाणी आहे. त्यांना अनेक वेळा अपयशाचा सामना करावा लागला.
सुरुवातीच्या दोन प्रयत्नांमध्ये तर साधी पूर्व परीक्षेचा टप्पा ही त्यांना ओलांडता आला नव्हता मात्र खचून न जाता त्यांनी तिसरा प्रयत्न केला, दिल्ली पोलीस असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस म्हणून त्यांची निवड झाली. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या आधी मध्य प्रदेश राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांना अनेक वेळा अपयश मिळवल सतत अपयश येत असल्यामुळे त्या पूर्ण खचून गेल्या. सर्व सोडून द्यायचा असाही विचार त्यांनी अनेक वेळा केला पण त्यांच्यातील यशासाठी प्रयत्न करण्याची जिद्द आणि अपयश हे माझं सगळं काही संपवून टाकणार नाही हा असलेला त्यांचा मनातला विचार तो त्यांना कधी शांत बसू देत नव्हता.
या अपयशावरती मात करायची असे त्यांनी मनाशी पक्क केल. त्यामुळे अपयश जरी आलं तरी त्या परीक्षा देत राहिल्या, त्यासाठी त्यांनी दिवस-रात्र मेहनत केली त्या बोलताना म्हणतात की, अपयशामुळे मी कंटाळून गेले होते. वैतागले होते वडील ऑफिसमध्ये गेल्यावर आपल्याला कुठे असं अडकवून ठेवायचं म्हणून आपण आईशी खूप भांडणही करायचं पण त्यानंतर वैतागत राहण्यापेक्षा प्रयत्न करत राहण्याचा हा मार्ग मी स्वीकारला आणि त्याचाच उपयोग आता मला झाला.
यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करताना जर कष्टाचा आणि मेहनतीचा हात सोडला असता तर नशिबाने ही आपली साथ सोडली असती, युपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा क्रॅक करण्यासाठी पन्नास टक्के आपली मेहनत, पन्नास टक्के आपल्याला झोकुन देऊन प्रयत्न करण्याची वृत्ती ठेवावी लागते, त्यामुळे किती वेळा अपयशाला हे महत्त्वाचं नसून प्रत्येक अपयशात खचून न जाता उभ राहणं हे महत्त्वाचं असतं. आपले प्रयत्न सुरूच ठेवणे हे महत्त्वाचं असतं असं छाया सिंह आपल्या अनुभवात आवर्जून सांगतात. अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं आपल्याला शालेय वयात शिकवल जातात , अपयशा मधून यशाचा मार्ग कसा काढायचा हे आपल्याला शिकण्यासाठी छाया सिंह यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास करणे फार महत्त्वाच आहे.