धक्कादायक : क्षुल्लक कारणावरून बसच्या चालक – वाहकासोबत केली अशी वागणूक, पहा सविस्तर.

एक मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रारही दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत या गावातून आरोपींना अटक केल्याची माहिती देखील समोर येते. बस कंडक्टर आणि ड्रायवर हे आपल्या ड्युटी वरती असताना बस स्टॉप जवळ काही नागरिकांनी त्यांना जबर मारहाण केली.
आदिवासी वाडीतील जमाव एकत्र करून रस्त्यावर मोटरसायकल आडव्या घालत एसटीचा रस्ता आडवला. बोर घाटातील गाडीत जाऊन चालक-वाहक यांना जबर मारहाण केली. यात पुरुषांसह महिलाही आघाडीवरती होत्या. या ग्रामस्थांनी एसटी कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. वाहक सुनील शेडगे यांनी याबाबत तळा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस करत आहेत. ड्रायव्हर सचिन जंगम आणि कंडक्टर सुनील शेडगे हे तळा शी गाडी घेऊन जात होते. तर येथे दोन प्रवासी रस्त्यात हात दाखवला असता जागे अभावी पुढे येण्याची विनंती वाहक शेडके यांनी केली. त्यानंतर शहरातील कॉर्नरवर गाडी उभी करून त्यांनी बस मध्ये प्रवाशांना घेतलं त्यापैकी एक आरोपी गाडीत बसला. तर दुसरा आरोपी हा मद्यपान केलेला होता, तो खाली होता त्या दोघांनीही दरवाजात कंडक्टरला मारहाण केली.
गाडीत बसलेल्या आरोपींनी कंडक्टरला लाथ मारून तो खाली उतरून गेला. रोवळा-वाशी एसटी बसमधील कंडक्टर आणि ड्रायव्हर हे आपली ड्युटी करत असताना बोरभाट बस स्टॉपजवळ काही नागरिकांनी त्यांना जबर मारहाण केली. बस ड्रायव्हर सचिन जंगम व कंडक्टर सुनिल शेडगे आपली तळा – वाशी गाडी घेऊन जात असताना तळे येथे 2 उन्मत्त आणि मद्यपी प्रवाशांनी गाडीला हात करून थांबण्याचा इशारा केला. मात्र जागेअभावी चालकाने गाडी थोडी पुढे नेऊन थांबवली व पुढे येण्याची विनंती केली.
या शुल्लक गोष्टीचा राग मनात धरून दोघांपैकी एकाने दरवाज्यात उभ्या असलेल्या वाहकाला कॉलर धरून मारहाण केली व तो निघून गेला. ही बस परत येत असताना याच इसमाने आदीवासी वाडीतील जमाव एकत्र करून रस्त्यावर मोटार सायकली आडव्या घालत एसटीचा रस्ता अडवला. बोरभाटातील जमावाने गाडीत जाऊन चालक व वाहक यांना जबरी मारहाण केली. यात पुरुषांसह महीलादेखील आघाडीवर होत्या.
या प्रकरणात कंडक्टर सुनील शेळके यांनी पोलिसात तक्रार दिली आणि त्यानुसार आरोपींना अटक करण्यात आली. या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर तातडीने कारवाई करत गावातून आरोपींना अटक केली. या कर्मचारी ड्युटीवर ती असताना त्याच्यावरती हात उचलणं हे अत्यंत मोठा गुन्हा आहे हा त्यांचा मोठा अपराध आहे हे चुकीचं कृत्य आहे. त्या अनुषंगाने काही कलमांतर्गत गुन्हा देखील दाखल होणार आहेत. आता यामध्ये पुढे काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मात्र अशा पद्धतीने सरकारी वाहन वरती हल्ला चढवणे हे चुकीचा आहे.