धक्कादायक: एकाच वेळी दोघांची आत्महत्या; पाहा काय आहे त्यामागचे कारण बातमीत सविस्तर.
मारेगाव तालुक्यातील दोन वेगवेगळ्या घटनांत दोन तरुणाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी मारेगाव पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नरसाळा परिसरातील एका मुरूमाच्या खदानीच्या खड्ड्यात उडी घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना आज दि. ६ ऑक्टोंबर रोज गुरूवारला सकाळी आठ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून दीपक देवीदास रामपुरे (वय २२) रा. गोंडबुरांडा असे तरूणाचे नाव आहे. दीपक हा दोन दिवसांपासून बेपत्ता झाल्याची माहिती सुत्रांकडून सांगण्यात आहे
दुसऱ्या घटनेत स्वप्निल राजू पाचभाई केगाव असे आत्महत्या करणाऱ्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे त्याने शेतामध्ये जाऊन कीटकनाशक औषध प्राशन केले असल्याची सकाळी ८च्या सुमारास वडील शेतात गेले असता ही घटना उघडकीस आली. मात्र, या दोघांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी मारेगाव पोलिस अधिक तपास तपास करत आहेत.