सोयगाव परिसरात दहा गावांना वादळी वाऱ्याचा अर्धातास तडाखा…
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव, दि.०७…सोयगाव परिसरात अचानक झालेल्या वादळी वाऱ्याच्या तडाख्याच्या चक्रव्यूहात १४ गावे अर्धातास अडकली होती..या अर्ध्यातासात तेरा गावात खरिपाची पिके आडवी पडली आहे त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे..या वादळी वाऱ्याच्या तडाख्यात तीस मिनिटात होत्याचे नव्हते झाल्याने शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे या वादळी वाऱ्याच्या तडाख्यात तेरा गावांमध्ये तब्बल पाच हजार तीनशे आठ हेक्टर वर पीक उध्वस्त झाली असून यामध्ये कपाशीचे पिके आडवी झाली आहे..
सोयगाव परिसरातील तेरा गावांना बुधवारी सायंकाळी चार वाजता अचानक वादळी वाऱ्याच्या चक्रव्यूहाने घेरले होते यामध्ये जरंडी परिसराला मोठा तडाखा बसला आहे.जरंडी, निंबायती शिवारात तब्बल एक हजारावरील हेक्टरवरील कपाशी पिके आडवी झाली असून वादळाचा फटका इतका जोरदार होता यामध्ये पहिल्या दहाच मिनिटात जरंडी शिवारात होत्याचे नव्हते झाले होते, माळेगाव, पिंप्री भागातही मोठे नुकसान झाले आहे.
माळेगाव, पिंप्री, जरंडी, कंकराळा, निंबायती,न्हावी तांडा, रामपुरा तांडा,बहुलखेडा, कवली,निमखेडी, घोसला, नांदगाव तांडा या तेरा गावांना वादळी वाऱ्याचा व काही प्रमाणात पाऊस झाल्याने खरिपाच्या पिकांचे नुकसान झाले आहे.दरम्यान या वादळी वाऱ्याने कपाशी, मका पिके दहाच मिनिटात आडवी झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास निसर्गाने हिरावून घेतला आहे …पिकांची नुकसानीची दाहकता प्रचंड असून महसूल आज कृषी विभागाकडून पाहणी व पंचनामे करण्याची मागणी होत आहे..
चौकट–जरंडीला भर रस्त्यावर मुख्य विजतार आडवी पडल्या मुळे सोयगाव-बनोटी रस्त्यावर भर वादळात वाहतूक ठप्प झाली होती त्यामुळे प्रवाशांना भर वादळी वाऱ्यात रस्त्यावर उभे राहण्याची वेळ आली होती. तातडीने जरंडी परिसरातील ग्रामस्थांनी महावितरणच्या वीज मंडळाने तातडीने मुख्य वीज तार दूर केल्याने रस्त्यावरील अडथळा दूर करण्यात आला…
—-दहा मिनिटात खरीप चक्काचूर—
सोयगाव परिसरातील तेरा गावात वादळी वारा झाल्याने दहा मिनिटात खरीप पिकांचा चक्काचूर झाला होता.त्यामुळे ऐन पिकांच्या फलोत्पादनच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या नशिबी निसर्गाने हातात अपयश आणले आहे…