अल्पवयीन मुलगी मदतीसाठी हाक देत राहिली, पण तिची कोणीच मदत केली नाही अखेर घडल अस काही.
या घटनेतली ती मुलगी जेमतेम 12 वर्षाची असेल , रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली ती अल्पवयीन मुलगी मदतीची याचना करत होती आणि लोक फक्त उभे राहून तिचा व्हिडिओ बनवत होते. घटनेची माहिती मिळताच एक पोलीस धावत आला, समाजात नेहमी पोलिसांना नावे ठेवली जातात,मात्र हेच पोलीस कधी कधी देवदूत ठरतात, त्यांनी मुलीला आपल्या हातात उचललं, मग ऑटोमध्ये बसवून तिला रुग्णालयात नेलं.
उत्तर प्रदेशातील कन्नौजमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.मुलीच्या कुटुंबीयांनी अपहरणानंतर बलात्कार झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे, मुलीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेला १५ तासांहून अधिक काळ लोटला तरी तिच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. मुलीला बोलताही येत नाहीये आणि घरच्यांनाही काही सांगता येत नाहीये. चुकीच्या उद्देशाने आपल्या मुलीचे अपहरण झाल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, मुलगी डाक बंगला गेस्ट हाऊसच्या मागे दयनीय अवस्थेत पडली होती. मुलीच्या घरापासून डाक बंगला गेस्ट हाऊसपर्यंत लावण्यात आलेल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. यादरम्यान, पीडित तरुणी एका तरुणाशी बोलत असल्याचं एका सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.
या फुटेजच्या आधारे पोलीस तरुणाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुलीला फूस लावून पळवून नेल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. चुकीच्या कामात अयशस्वी झाल्यानंतर तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुलीच्या हाताला, पायाला आणि डोक्याला अनेक जखमा आहेत, यामुळे हे प्रकरण काय आहे यात काय घडल असेल , पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत