अजून फुटी कवडी दिली नाही या सरकारने, निषेध म्हणून शेतकऱ्यांनी पहा कशी केली दिवाळी साजरी.
काही दिवसांपूर्वी राज्यांमध्ये परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता आणि या परतीच्या पावसामुळे लाखो हेक्टर जमीन जमिनीतील पिकांना या पावसाचा चांगलाच फटका बसलाय तसेच दिवाळी सारख्या सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलं आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे राज्यात झालेल्या पावसाने सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे यानंतर विरोधी पक्षांसह राज्यातील शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे मदत मागितली परंतु राज्य सरकारने अद्यापही कोणतीही मदत केली नाही अशी तक्रार औरंगाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकडून होत आहे म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील पिकांचे पंचनामे होत नसल्याने शेतकऱ्यांनी एक अनोखे असे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्याच्या वायगाव मधील शेतकऱ्यांनी आपली दिवाळी चक्क स्मशानभूमीमध्ये साजरी केली आहे राज्य सरकारने आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे लक्षण दिल्याने पंचनामे सुरु न केल्याने नुकसान भरपाई न मिळाल्याने ही दिवाळी साजरी करण्यासाठी मुलांना कपडे आणि फटाके नाहीत आणि याचमुळे या शासनाचा निषेध करून दिवाळी स्मशानभूमीत साजरी करीत असल्याचे येथील शेतकऱ्यांना सांगितला आहे यावेळी हेक्टरी 50 हजार रुपये पर्यंतची भरपाई देण्यात यावी व ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात आली
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी औरंगाबाद दौरा केला होता त्यावेळेस त्यांच्याकडे शेतकऱ्यांनी त्यांच्यावर कशाप्रकारे हाल झाली हे सांगितलं पंचनामे कधी करणार तोपर्यंत शेतकऱ्यांची हाल होऊन जातात पण ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे शेतकऱ्यांना हे 50 हजार प्रती हेक्टर मदत मिळाली पाहिजे अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलेली आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते आणि म्हणून शेतकऱ्यांची शेतीची पाहणी करण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरे औरंगाबाद मध्ये पोहोचले होते दहेगाव व गंगापूर परिसरातील गावांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर चांगलीच टीका केली.
एकीकडे दिवाळी चालू आहे तर दुसरीकडे या पावसानं शेतकऱ्यांचे दिवाळी निघाला आहे कपडे काय घालायचे असा प्रश्न सर्वांना पडला तर शेतकऱ्यांच्या घरी दिवाळी फराळ कसं होणार ही एक चिंता लागून राहिली आहे शेतकऱ्यांच्या घरी भकास वातावरण आहे गेल्या काही दिवसांपासून पुण्यात देखील प्रचंड पाऊस झाला आणि पाऊस किती पडावा हे महापालिका ठरवत नाही असे उत्तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या आधी दिलं होत. फडणवीस यांच्या अशा वक्तव्यावर उद्धव ठाकरे म्हणतात की, त्यांच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात. आज ते म्हणतील संपूर्ण चिखल झाला. पाणी आलं. पण ग्रामीण भागामध्ये किती पाऊस पडावा हे देखील सरकारच्या हातात नसतं. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी चक्क फडणवीसंना टोला लगावला आहे.