दुखःद : बापासाठी जेवणाचा डबा घेऊन जाणारे ते दोघं पुन्हा घरी परतलेच नाही, पहा त्यांच्यासोबत काय घडलं.
आपली मुलं हे प्रत्येकासाठी जीव की प्राण असतात. मुलं लहान असताना त्यांना जीवापाड जपली जातात. हीच मुलं मोठी झाल्यानंतर आई वडिलांचे छोटे मोठे काम ते ऐकत असतात. आपले वडील कामावरती जातात म्हणून त्यांना दुपारचे जेवण देण्यासाठी हे दोघे जण जात होते. त्यांच्यासोबत अत्यंत दुःखद अशी घटना घडली.
सध्या पावसाचे दिवस आहेत, सर्वत्र नद्यांना -ओढ्यांना पूर आलेले आहे. काही ठिकाणी रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेला आहे. त्यामुळे पाण्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे अनेक दुर्घटना घडतात. नदीपात्रात वाहन वाहून जाणं, गाड्या पलटी होणं अश्या अनेक घटना घडत असतात.
विद्रूपा नदीतून ही दोन मुलं बुडाल्याचे दुःखद घटना समोर आली. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या मनाब्दा गावात ही घटना घडली. ऋषी सुरळकर आणि सागर दांडगे असं मृत पावलेल्या दोघांची नावे आहेत.
नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने मुलं बुडाले आहेत. वडिलांसाठी जेवणाचे डबे घेऊन जात असतानाच हा प्रकार घडला. त्यामुळे गावावरती शोककळा पसरली ऋषी आणि सागर हे त्यांच्या वडिलांसाठी जेवणाचा डबा घेऊन जात असतानाच हा प्रकार घडला या दोघांचे वडील शेतमजूर आहेत. ऋषी आणि सागर यांचे वडील नदीच्या पलीकडे शेतामध्ये काम करत होते नदीपात्र ओलांडताना दोघांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्यामुळे ही दोन मुलं बुडाली. ग्रामस्थांनी या दोघांना नदीकाठी पोहोचवलं पण त्यांना पाण्यातून बाहेर काढायला उशीर झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना असे दाखल झाले दोघांचेही मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले याप्रकरणी स्थानिक पोलीसानी कडून घटनेची नोंद करण्यात आली या घटनेमुळे मनब्दा या गावावरती शोक कळा पसरली. वडिलांना जेवण घेऊन जाणाऱ्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.