उगवत्याच्या मागे या, मावळत्यांच्या नादी लागू नका !-खा. नीलेश लंके
विधानसभा निवडणूक सुरू झाल्यानंतर काही उमेदवार मतदारांपुढे येत आहेत. हे उमेदवार भुछत्रासारखे आहेत. निवडणूकीनंतर ते पुन्हा मावळणार आहेत. ते परत येणार नाहीत. मी उगवता सुर्य आहे. उगवत्या सुर्याच्या मागे या, मावळत्यांच्या नादी लागू नका.
महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांच्या प्रचारार्थ अळकुटी गणाच्या वतीने अळकुटी येथे रविवारी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, महानगर बँक व जिल्हा बँकेच्या संचालक गीतांजली शेळके, गितांजली शेळके, बहुजन रयत परिषदेच्या अध्यक्षा ॲड. कोमल साळुंके, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. सिताराम काकडे, डॉ. भास्कर शिरोळे, शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष प्रियंका खिलारी, बाबाजी भंडारी, कुंदनमल साखला, बाळासाहेब पुंडे, सखाराम उजघरे, संतोष काटे, किरण डेरे, सुवर्णा धाडगे, गुंडा भोसले, अनिल आवारी, धोंडीभाउ झिंजाड, किरण पानमंद, श्रीकांत डेरे, निवृत्ती गाडगे यांच्यासह अळकुटी गणातील असंख्य नागरीक यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा. लंके म्हणाले, निवडणूकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांची प्रचाराची धुरा अतिशय समर्थपणे जबाबदारीने पार पाडली. दोन दिवस राहीले आहेत. आपणच उमेदवार म्हणून काम करा. मागील पाच वर्षात किमान दोन हजार कोटी रूपयांचा निधी आपण आणला. काही कामे प्रलंबित आहेत. ती कामे माग लावण्यात येतील. म्हस्केवाडी रस्त्याचे काम प्रलंबित आहे. पहिल्याच टप्प्यात हे काम माग लावले जाईल. गोसावी माता सभामंडपासाठी पाडळीआळेच्या नागरीकांनी मागणी केली आहे, त्यांच्या अपेक्षापेक्षाही अधिक चांगला सभामंडप देऊ, तुम्ही तो पाहत राहाल. पाडळीआळे येथील मोरया गृपने राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यांचे पक्षात स्वागत करतो. रेनवडी, रांधे, दरोडी, वडनेरचे एकही काम मागे ठेवणार नाही शिरापुरचेही एकही काम मागे ठेवणर नाही. सर्वच गावांमधील कामे माग लावली जातील कोणीही काळजी करू नये. कळस गावाने एकमुखी निर्णय घेत विरोधी उमेदवाराचे बुथ न लावण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे तेथील विकास कामांकडेही लक्ष द्यावे लागेल असे खा. लंके यांनी सांगितले.