नगर : गर्भपाताच्या गोळ्यांचा बेकायदा पुरवठ्यावरून अधिवेशनामध्ये अहमदनगरची चर्चा. पहा सविस्तर.

यंदाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये अहमदनगरची चर्चा झाली. हि चर्चा नेमकं कुठला विषयावरती झाली विधानसभेत हा मुद्दा कसा गाजला यावरती नजर टाकूयात.
एमआयडीसी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी पकडलेला अवैध्य गर्भपाताच्या गोळ्यांचा प्रकरण विधानसभेत चर्चेचा विषय ठरला. हरियाणा राज्यातून अहमदनगर जिल्ह्यात प्रामुख्याने शहरी भागात गर्भपाताच्या गोळ्यांचा बेकायदापुरवठा होत आहे. एमआयडीसी पोलीस तसेच अन्न औषध 9000 गोळाचा साठा जप्त केल्याची माहिती समोर आली होती.
ही माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत लेखी प्रश्नांच्या उत्तरांमध्ये मांडणी केली आहे. समाजवादी पक्षाचे आमदार रवी शेख यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला शिवाय डॉ च्या सल्ल्याशिवाय मेशो ॲपवरती ऑनलाईन पोर्टलवरती गर्भपाताचे औषध मिळत असल्यास हे राठोड यांनी लेखी उत्तरात मान्य केला. ऑनलाईन ॲप वरती डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय गर्भपाताच्या गोळ्यांचे विक्री केल्याप्रकरणी राज्यात 14 ठिकाणी दाखल करण्यात आली आहे.
अशी माहिती देखील संजय राठोड यांनी दिली या मागील सरकारमध्ये संजय राठोड यांची मोठी चर्चा झाली होती. पूजा प्रकरणात संजय राठोड यांची चर्चा झाली होती आणि त्यातही कथेत गर्भपाताचे आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेले आहेत. आणि ते सध्या औषध प्रशासन मंत्री झालेले आहेत. त्यामुळे त्यांनी उत्तरांमध्ये या सगळ्या गोष्टी मान्य करत अहमदनगर मधील जो गर्भपात्यांच्या गोळाचा साठा सापडलेला आहे त्यासाठी पुढे काय कारवाई केली जाणार आहे असा मुद्दा संदर्भात समाजवादी पक्षाच्या आमदार यांनी प्रश्न उपस्थित केले होते.