गणपती मिरवणुक महापौराच्या घरासमोर येताच पहा काय घडले, पहा बातमी सविस्तर.
गणेशोत्सवानिमित्त अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, मोठ्या प्रमाणात ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढली जाते, गाण्यांच्या ठेक्यावरती गुलाल उधळला जातो. या कार्यक्रमांना गालबोट लागण्याची देखील दाट शक्यता असते, मेहरून मधील एक गाव एक गणपती आणि जय श्रीराम मित्र मंडळाचे मिरवणूक जात असतानाच, एक गाव एक गणपती मंडळाचे कार्यकर्ते दुसऱ्या मंडळाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले.
यातील काही तरुणांनी महापौर जयश्री महाजन यांच्या घरासमोर गुलालाची उधळण करून त्यांच्या घरावर गुलाल आणि दगडफेक केली. त्यानंतर वातावरण मात्र पेटलं, दोन गटांमध्ये समोरासमोर येऊन वाद उफळला, या घटनेला राजकीय किनार असल्याचा देखील म्हटले जाते. घटनास्थळावरती पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला,
यावेळी मिरवणूक थांबवण्यात आली मिरवणुकीतील कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याने महापौरांच्या घरासमोर मिरवणूक थांबवण्यात आली त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता . मात्र हा सर्व प्रकार कसा घडला यामागे काय कारण आहे हे शोधण्याचे काम पोलीस करत आहेत घटनास्थळी पोलिसांनी येऊन ही परिस्थिती नियंत्रणात आणली त्यामुळे मोठा वाद होण्यापासून टळला.