पोलिसांकडेच पुरावा मागणे त्याला पडले महागात; पुरावा दाखवून पाहा पोलिसांनी त्याच्यासोबत काय केलं.
वाहतुकीचे नियम हे आपल्या सर्वांसाठी महत्वाचे असतात , त्याचे पालन कराव लागत . मात्र वाहतुकीचे नियम मोडण की एक नवी परंपरा होत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात ,त्यात मरण पावण्याच्या घटना वाढतात. हेल्मेट घातले नाही तर दंड भरावा लागेल या भीतीने अनेकजण फक्त लांबून पोलीस उभे असलेले दिसले की लगेच हेल्मेट घालतात. इतरवेळी मात्र विना हेल्मेट बाईक किंवा स्कूटर चालवताना दिसतात.
हेल्मेट सक्तीचा नियम हा आपल्याच सुरक्षेसाठी करण्यात आला आहे हे अनेकांच्या लक्षात येत नाही, त्यामुळे काहीजण नियम तोडून उलट पोलीस, ट्रॅफिक हवालदार यांच्याशी वाद घालत असलेले आपण पाहिले असेल. असाच काहीसा प्रकार बंगळूरमध्ये घडला, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
फेलिक्स राज नावाच्या व्यक्तीला बंगळूर ट्रॅफिक पोलिसांकडून एक नोटिफिकेशन पाठवण्यात आले. स्कूटर चालवताना हेल्मेट न घातल्याने, ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड आकरण्यात आल्याचे हे नोटीफिकेशन होते. पण या व्यक्तीने हेल्मेट न घातल्याचा पोलिसांकडे काय पुरावा आहे, असा प्रश्न ट्विटरवर विचारला.
बंगळूर ट्रॅफिक पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा फोटो ट्विटरवर शेअर करत याचा पुरावा दिला. पाहा बंगळूर ट्रॅफिक पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला फोटो.नेटकऱ्यांच्या या भन्नाट प्रतिक्रिया पाहून आणि फेलिक्स राज या व्यक्तीला आलेला अनुभव वाचून यापुढे कोणीही पोलिसांकडे पुरावा मागणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे.