लाडक्या बहिणींना १५०० नाही तर आता मिळणार तब्बल ४०००० रुपये, महायुती सरकारचा महा – प्लॅन ?

एका राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे त्यावेळेस अजित पवार त्या ठिकाणी उपस्थित होते. 3000 हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा यावेळी पार पडला यावेळी अजित पवार यांनी महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात नवा प्रस्ताव आणण्याची माहिती दिली
याबाबत अजित पवार यांनी सांगितले की, सरकार बँकांसोबत चर्चा करणार असून महिलांना उद्योगासाठी किमान भांडवल 30 ते 40 हजार रुपयांचं उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. लाडक्या बहिणींना दिले जाणारे १५०० रुपये बँकेकडे जमा होतील असं अजित पवार म्हणाले आहे लाडक्या बहिणींना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी भांडवल देण्याचा विचार केला जात असल्याचं पवार यांनी सांगितलं
सरकारी बँकांशी याबाबत चर्चा करणार आहोत असे देखील ते म्हणाले महिलांना उद्योगासाठी भांडवल मिळावं ज्यातून त्यांचा स्वतःचा उद्योग सुरू होईल यासाठी 30 ते 40 हजार रुपये देण्याचा विचार केला जात आहे याबाबत अधिक माहिती देताना असे सांगितले की महिलांना दर महिन्याला मिळणारे १५०० रुपये हे बँकेकडे जमा होतील.
अजित पवार यांनी सांगितलं की लाडक्या बहिणींना मला सांगायचं आहे की कधीकधी आमच्याबद्दल गैरसमज देखील पसरवले जातात ज्या लाभार्थी महिला आहे त्यांच्यासाठी लाडक्या बहिणींना दर महिन्याला १५०० रुपये देतो ही कधीच योजना बंद होणार नाही या योजनेमधून महिलांना मदत मिळावी असा आमचा प्रयत्न आहे आम्ही आणखी एक प्रस्ताव आणलेला आहे यासंदर्भात सध्या बँकांशी बोलणं सुरू आहे
काही जिल्हा मध्यवर्ती बँका चांगल्या स्तरावर आहेत १५०० रुपये महिलांना दिले जातात त्याऐवजी 30 ते 40 हजार रुपये महिलांना द्यायचे आणि त्यांचा येणारा हप्ता हा लाडकी बहीण योजनेतून दिला जाईल महिलांना भांडवल मिळालं तर त्या व्यवसाय सुरू करू शकतात त्यातून त्यांचं कुटुंब स्वतःच्या पायावर उभे राहू शकेल महाराष्ट्रातील बहिणींनी हे करावं असं आम्हाला वाटतं या कार्यक्रमाबद्दल आमच्या चर्चा सुरू असून याचा आपण फायदा घेतला पाहिजे असं अजित पवार यांनी बोलताना सांगितलं