आ. राम शिंदें यांच्याकडे आता गद्दारांना थारा नाही ! पहा सविस्तर ते काय म्हणाले.
आता महाविकास आघाडीचे सरकार कोसळून शिंदे- फडणवीस यांचे सरकार सत्तेत आले. आणि जामखेड कर्जत मतदार संघात प्रा. राम शिंदे आमदार म्हणून आले. कारण नव्या सरकार मध्ये प्रा. राम शिंदे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागली. त्यामुळे कर्जत- जामखेड मतदारसंघात पुन्हा प्रा. राम शिंदे यांची चलती सुरु झाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर दगाबाजी करणारे काही गद्दार स्वार्थापोटी पुन्हा एकदा त्यांच्याशी जवळीकता साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते.
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी प्रा. राम शिंदे यांची साथ सोडत विरोधकांशी हातमिळवणी केली. त्याचा परिणाम म्हणून रोहित पवार यांनी शिंदे यांचा धक्कादायक पराभव केला. त्यानंतर कर्जत नगरपंचायतच्या निवडणुकीदरम्यान अनेकांनी साथ सोडल्याने भाजपची सत्ता गेली.
राज्यात सत्ता येताच पुन्हा स्वार्थापोटी लुडबुड करणाऱ्यांना थारा मिळणे अवघड झाले आहे. मोजक्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावर मतदारसंघात पुन्हा नवीन फळी तयार करण्याचे दिव्य प्रा. शिंदे यांना पार पाडावे लागणार आहे.
पराभव झाल्यानंतर अडचणीच्या काळात निस्वार्थीपणे साथ देणारे मोजके कार्यकर्ते हीच त्यांची खरी शक्ती आहे. आ. रोहित पवारांच्या प्रभावासमोर टिकून राहत ज्यांनी पक्षांची विचारधारा पुढे नेली, त्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम सध्या आ.राम शिंदे करत आहेत त्यामुळे येत्या काळात जुनी छक्के पंजे माहित असल्याने नवे डाव खेळत पुन्हा एकदा मतदार संघ लवकर काबीज करतील अशी चर्चा रंगू लागली आहे.