बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमात गोंधळ, दोन गट समोरच भिडले
खा.सुप्रिया सुळे यांच्या समोरच गोंधळ घातला, भाजपच्या नेत्याने देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामतीच्या दौरा वरती आल्यामुळे चर्चेत आहेत. अशातच बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमांमध्ये गोंधळ झाल्याचा पाहायला मिळत आहे, जेजुरी ते निरा नरसिंहपुर रस्ता डार्लेवाडी गावातून जातो. गावठाणात रस्ता कॉंक्रिटीकरण दहा मीटर व्हावं की सात मीटर व्हावं यावर गावकऱ्यांमध्ये वाद होता याच मुद्द्यावरून दोन गट सुप्रिया सुळे यांच्या समोरच वाद घालू लागले
काय आहे वाद ?
बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गावातून राज्यमार्गाचे काम सुरू आहे. या ठिकाणी दहा मीटर रुंदीकरण प्रस्तावित असून यामध्ये ग्रामस्थांमध्ये वाद आहेत एक गट म्हणाला सदरचा रस्ता सात मीटरचा करण्यात यावा. तर दुसऱ्या गटाने दहा मीटरचा रस्ता व्हावा अशी मागणी केली. त्यामुळे या वादाला आणखी तोंड फुटले. सुप्रिया सुळे आज गाव भेटीच्या दौऱ्यावर आल्यानंतर यासंदर्भात एका ग्रामस्थाने त्याची अडचण सांगितली आणि पाहता पाहता अनेक जण उठून यामध्ये स्वतःची भूमिका मांडू लागले आणि त्यातून गोंधळाला सुरुवात झाली. यानंतर सुप्रिया सुळे यांनी सर्व ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यानंतर ग्रामस्थांची समजूत घालत यातील नेमका वाद समजून घेतला आणि विरोधी पक्षनेते अजित पवार, मी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता एकत्र बसून यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले. यानंतर गोंधळ शांत झाला. दरम्यान याविषयीचा गोंधळ सुमारे अर्धा तास सुरू होता. मात्र सुप्रिया सुळे यांनी एका एका ग्रामस्थांची बाजू समजून घेतली आणि त्यानंतर सर्वांना समजून सांगितले.
अर्थमंत्री ह्या बारामतीच्या दौऱ्यावरती आल्या तेव्हा त्यांनी अनेक टीक केल्या, मात्र आता बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाव भेटीच्या दरम्यान एका गावामध्ये जो हा गदारोळ झाला त्यामुळे खा. सुप्रिया सुळे देखील यांची ही चर्चा सुरु झाली.