दत्त पदयात्रेचा भाविकांनी आवश्य लाभ घ्यावा.-प.पुज्य मनोहर गीरी महाराज.
किनवट तालुका प्रतिनिधी मारोती देवकते
श्री प.पु. आदरणीय महंत मधुसूदन भारती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने तसेच श्री प.पु. मनोहर गिरी महाराज यांच्या मार्गर्शनाखाली सतत 31 वर्षा पासून चालत असलेली श्री क्षेत्र दत्त मंदिर बाजारहतनूर ता. बोथ जि. आदिलाबद ते श्री क्षेत्र दत्त शिखर माहूरगड पदयात्रा.
बाजार हतनूर येथून निघून मुक्काम दर मुक्काम करत पालखी श्री क्षेत्र माहूरगड येथे जात आसताना. आज सकाळी कमठाला गावामध्ये समस्त गावकऱ्यांच्या हस्ते पालखीची पूजा व स्वागत करून सकाळ चा नाष्टा देण्यात आला. दुपारचे जेवण कमठाला क्यांप येथे देऊन सायंकाळ चा मुक्काम व जेवण रोहिदास तांडा येथे करण्यात आला त्या प्रसंगी पालखी सोबत श्री कृष्ण कथा व दातात्रय चरित्र कथेचे आयोजन केलेले आसता.
सायंकाळी 8 वाजता श्री दत्ता महाराज पुरी व त्यांचे सहकारी शिंथ वादक बालाजी महाराज गरड, तसेच तबला वादक म्हणून बालाजी महाराज, सुंदर आशि श्री कृष्ण कथा, दातात्रय चरित्र कथा करण्यात आली.
पालखी चे व्यवस्थापक – श्री राजु महाराज गिरी, तसेच सोबत बालाजी महाराज गिरी, अविनाश महाराज गिरी, यांची उपस्थिती राहून पालखी चा शेवट मुक्काम दिनांक १८/०१/२०२३ रोजी माहुर येथे होणार तसेच रात्री महापूजा करून सकाळी काकडा झालं की पालखीचे प्रस्थान बाजार हतनूर इकडे होणार आशि माहिती मठाधिपती प. पु. श्री मनोहर गिरी महाराज दत्त मंदिर बाजार हतनूर यांनी दिली.