तुमच्या बापाचं नाव तुमच्या आईला विचारायला जायचं का ? किशोरीताई पेडणेकर पहा बातमी सविस्तर.
मुंबईः शिंदे गटातील नेते रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या वक्तव्यावरून शिवसेना नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. मुंबईच्या माजी महापौर यादेखील चांगल्याच आक्रमक झाल्यात. ज्या रामदास कदम यांना उद्धव ठाकरेंनी मोठं केलं. त्यांच्याच बाबतीत अशी भाषा वापरणं चुकीचं आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. अशी भाषा वापरायची असेल तर बरं झालं आमच्या पक्षातून ही घाण निघून गेली, असं वक्तव्यही त्यांनी केलं आहे.
सहा महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंचे आभार मानणारे वक्तव्य करणारे रामदास कदम असे कसे बोलू शकतात, हे सांगताना किशोरी पेडणकर यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना रामदास कदम यांच्या भाषणाची जुनी क्लिप दाखवली.
‘बाळासाहेबांनी विश्वास टाकला आणि यांच्या मुलाला आमदार केलंत. बाळासाहेब ऐकत नव्हते तर वहिनींकडे जाऊन मस्का मारायचे. पण आज किचनपर्यंत जाण्याची यांची जीभ सुटली. एवढा लाळघोटेपणा करणारा नेता गेला. कदम याच्या जाण्याने बरं झालं घाण गेली’, असं वक्तव्य किशोरी पेडणेकरांनी केलंय.
राज्यपालांकडील 12 आमदारांमध्ये आमदारकी मिळावी, म्हणून रामदास कदमांचे हे प्रयत्न सुरु आहेत. एवढं वाटत होतं तर तुमच्या मुलाला आमदार का बनवलंत ? तुमच्या बापाचं नाव तुम्हीच लावताय नं… मग आम्ही तुमच्या आईला तुमच्या बापाचं नाव विचारायला जायचं का ? काय चाललंय का ?’ असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला.