जरंडी येथे कार्तिकमास काकड आरती समाप्ती; गावातून श्री बालाजी भगवंतांची काढण्यात आली पालखी.
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव तालुक्यातील जरंडी येथे कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा कालावधीत बालाजी मंडळाकडून गावातून दररोज सकाळी कार्तिकमास काकड आरती काढण्यात येत असे.
श्री बालाजी यावेळी गावातील माता-भगिनी ,गावातील ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती दिनांक ९ नोव्हेंबर रोजी बालाजी मंदिर येथे अन्नदान करून रात्री श्री बालाजी भगवान यांची गावातून पालखीची टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढून बालाजी मंदिरात कार्तिकमास काकड आरतीची समारोप करण्यात आला.
यावेळी बालाजी भजनी मंडळाचे सुधीरनाना कुलकर्णी,धनराज पाटील,अनिल पाटील,अनिल महाजन,ओम सोनार,नामदेव पाटील,रवींद्र पाटील,कृष्णा पाटील, वसंत सोनार,बापू सोनार,शांताराम पाटील,अनिल माळी यांच्यासह गावातील शेकडो महिला व ग्रामस्थांनी आपली उपस्थिती दर्शवली