महाराष्ट्रात सध्या काळू-बाळूचा तमाशा,एक दाढीवाला अन दुसरा बिन दाढीवाला ! पहा कोणी केले असे वक्तव्य.

महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या गोष्टी काही सुरू आहेत. त्या गोष्टी समजल्या पलीकडचे आहेत. सर्वसामान्याला समजेल असं काही घडत नाही. मात्र जे काही घडते आहे याची मज्जा सर्वजन घेत आहेत. विकास काम तर लांबच पण सर्वजन फक्त एकमेकावर टीका करणात मश्गुल आहेत.
यातच आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी देखील उडी मारली. या त्यांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणतात ” महाराष्ट्रात सध्या काळूबाळू चा तमाशा सुरु आहे,एक दाढीवाला आणि दुसरा बिन दाढीवाला…!!
मनात आले की बिन दाढीवाला, दाढीवाल्याचा माईक खेचतो, राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं ज्याला कळत नाही तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा सुवर्ण कलश आणला ते दिल्लीकरांशी भांडले. महाराष्ट्रात शिरण्याचा प्रयत्न दिल्लीश्वरानी कायम केला.
2022 मध्ये मिळालेले मुख्यमंत्री जन गण मन सुरू असताना सारखा शर्ट खाली खेचत होते. अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी टीका केली, ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी सांगोला मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शहाजी बापू यांच्यावर ती देखील हल्लाबोल केला. आपण इतिहासामध्ये ऐकलं असेल, वाचलं असेल अलीबाबा चाळीस चोर परंतु वास्तवात अलीबाबा चाळीस चोर कसे पळतात महाराष्ट्राने पाहिलं.
शिवसेना प्रमुखांच्या पायाच तीर्थ प्यायचं सुद्धा आ.शहाजी बापू पाटील यांची लायकी नाही, पुढे म्हणाले की आहेत ”काळूबाळू चा तमाशा आणि सोंगाड्या शहाजीबापू… व्याधीमुक्त शिवसेना झाली आहे हे बरे झाले, असा घणाघात खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांवर ती केला आहे.