पैसे देऊनही सावकाराची धमकी; त्रासाला कंटाळून पुण्यात शेतकऱ्याने स्वत:ला संपवलं, चिठ्ठीत लिहिलं…
शेतकऱ्याच्या नशिबी नेहमी कसला ना कसलं टेन्शनच असतं, शेतकरी हा शेतात पिकवतो आणि तो विकतो आणि त्यानंतर पोटाला खातो. अशाच एका शेतकऱ्याची ही बातमी सावकाराच्या जाचाला कंटाळून एका शेतकऱ्याने आपल्या जीवन संपावर सावकाराचे पैसे देऊन देखील सावकार सातत्याने त्रास देत होता आणि याच त्रासाला कंटाळून या शेतकऱ्यानं आत्महत्या केली या पैसे दिले नाही तर तुझी जमीन नावावर करून देईन अशी धमकी तो सावकार वारंवार देत होता आणि त्यामुळे या शेतकऱ्यांना आत्महत्या केली या शेतकऱ्याच्या खिशात चिठ्ठी सापडली
त्यामध्ये लिहिलेलं होतं 28 लाख दे नाहीतर जमीन नावावर करून दे आणि यानंतर या प्रकरणाचा उलघडा झाला,पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावकाराच्या जाचाला कंटाळून एका शेतकऱ्याने आपली जीवन यात्रा संपवली आहे. पैसे देऊनही सावकार कर्जापोटी २८ लाख रुपयांची मागणी करत. होता. पैसे नाही दिले तर जमीन नावावर करून देण्याची सतत मागणी करत होता. या त्रासाला कंटाळून अखेर शेतकऱ्याने शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे.
संबंधित शेतकऱ्याच्या खिशात एक सुसाइड नोट सापडली आहे.सतीश बाजीराव शिळीमकर (वय ४३) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून ते भोर तालुक्यातील कुरंगवडी येथील वास्तव्यास होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अमृत महादेव शिळीमकर असे गुन्हा दाखल झालेल्या सावकाराचे नाव आहे. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात सावकाराविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश शिळीमकर हे कुरंगवडी येथे आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होते.
काही दिवसांपूर्वी शिळीमकर यांनी महादेव शिळीमकर यांच्याकडून कर्ज घेतले होते. त्यांचे पैसे देऊनही कर्जापोटी २८ लाख रुपये देण्याची मागणी तो करत होता. पैसे न दिल्यास जमीन नावावर करण्याची धमकी दिली होती. घेतलेल्या पैशांची परतफेड करून देखील सावकाराच्या मागणीला व धमकीला कंटाळून शेतकरी सतीश शिळीमकर यांनी आत्महत्या केली.