आजी माजी विद्यार्थी, ग्रामस्थांना क्रीडांगण खुले करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हाध्यक्ष तुकाराम गेरंगे यांनी दिले निवेदन.
मा. जिल्हाधिकारी साहेब
जिल्हा अहमदनगर
विषय :- मोजे निंबळक हद्दीतील गट नंबर 102/2 महाराष्ट्र शासन राखीव असलेल्या ग्रामविकास विद्या प्रसारक मंडळ निंबळक यांना क्रीडांगणासाठी देण्यात आलेल्या क्रीडांगण आजी-माजी विद्यार्थी ग्रामस्थ यांना खुले करून देण्यात यावे अन्यथा बेमुदत उपोषण वेळे प्रसंगी आत्मदहन करणे बाबद.
मोहादय,
विनंतीपूर्वक अर्ज करतो की, ग्रामपंचायत निंबळक हद्दीतील महाराष्ट्र शासन राखीव गट नंबर 102/2 माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर यांचे आदेशावरून, सर्व अटीस पात्र राहून (751) ग्राम विकास विद्या प्रसारक मंडळ अध्यक्ष व सचिव यांना शालेय मुलांच्या क्रीडांगणासाठी देण्यात आला आहे. संस्था स्थापनेपासून ते फेब्रुवारी 2023 पर्यंत शाळेतील मुलांसाठी व आजी-माजी विद्यार्थ्यांसाठी क्रीडांगण हे खेळण्यासाठी, व्यायामासाठी, खुलेठेवण्यात आलेली होते.
ग्राम विकास विद्या प्रसारक मंडळामध्ये स्थापनेपासून ते आज रोजी पर्यंत वर्षानुवर्षी वाद आहेत. गोरगरीब शेतकरी कष्टकरी यांच्या मुलांचे हित पाहता सध्या स्थिती स्वयंघोषित अध्यक्ष व सचिव माननीय धर्मादाय आयुक्त यांच्या निकालाप्रमाणे 2015 रोजी कार्यकाळ संपलेले. यांनी मनमानी पद्धतीने गुंड प्रवृत्तीने दमदाटी करून क्रीडांगणाचा वापर गावातील आजी-माजी विद्यार्थ्यांना बंद करून क्रीडांगणाला कुलूप लावलेले आहे. माध्यमिक विद्यालय येथून शिक्षण घेऊन माजी विद्यार्थी आज खूप मोठ्या सरकारी हुद्द्यावर आहेत.
सन 2017 मध्ये विद्यालयातील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी पुढाकार घेऊन माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले होते.
त्यानिमित्ताने शाळेच्या विकास कामासाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी जमा करण्यात आला होता. त्यावर शग्ळेचे विकास कामे व क्रीडांगणाचे काम करण्यात आले होते. तसेच क्रीडांगणावर आज रोजी पर्यंत गावातील गरीब कुटुंबातील बऱ्याच मुलांनी सराव करून आज राष्ट्रीय पातळीवर गोल्ड मेडल मिळवलेले आहेत. याच मैदानावर विद्यापीठ खेळाडू ही घडवलेले आहेत.
तसेच दरवर्षी या मैदानावरील आजी-माजी विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय स्पर्धा खेळलेले आहेत. निंबळक हे गाव खेळाडू विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध आहे या गावातील खूप विद्यार्थी खेळाडू मधून निवडून आज भारतीय सैन्य दलात, महाराष्ट्र पोलीस दलात वेगवेगळ्या शासकीय आस्थापनामध्ये कार्यरत आहेत. 2023 मध्ये निवड झालेल्या पीएसआय परीक्षेमध्ये निंबळक स्पोर्ट क्लबचे तीन विद्यार्थी खेळाडू म्हणून निवड झालेले आहेत
हे क्रीडांगण कुठल्याही एका संस्थेसाठी नसून आज रोजी पर्यंत संपूर्ण गावच्या मुलांसाठी होते म्हणून खेळाची आवड असणारे या शाळेचे माजी विद्यार्थी एकत्र येऊन नवीन विद्यार्थ्यांना खेळाचे प्रशिक्षण देत असतात. याच माध्यमातून निंबळक स्पोर्ट क्लब स्थापन करण्यात आलेला आहे. स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून क्रीडांगण माती टकाने, लाईट बसवणे, खुर्थ्यांची सोय, करणे हे सर्व माजी विद्यार्थी यांच्या व जे विद्यार्थी आज नोकरी करत आहेत त्यांच्या प्रयत्नातून चालू आहे. परंतु आज रोजी स्वयंघोषित अध्यक्ष सचिव की त्यांचा कार्यकाल हा 2015 मध्ये संपलेला आहे
त्यांची परमिट रूम बियर बार सारखे तसेच गावठी दारू विक्री करण्याचे धंदे निंबळक गावामध्ये चालू आहेत. अशा व्यक्तींकडून खेळाडू मुलांचे नुकसान होत आहे. क्रीडांगण हे शासकीय जागेत आहे माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने ग्रामविकास मंडळास क्रीडांगणासाठी दिलेले आहे. तरी गोरगरीब मुलांची माजी विद्यार्थी यांचे हित पाहता या क्रिडांगणाची खरी गरज गावातील गरजू खेळाडूंना आहे स्वयंघोषित अध्यक्ष व सचिव यांची गुंड प्रवृत्ती मोडीत काढून क्रीडांगण पुन्हा पूर्ववत सर्वांसाठी खुले करण्यात यावे अन्यथा सात दिवसाच्या मुदतीनंतर आपल्या कार्यालयासमोर आजी-माजी विद्यार्थी ग्रामस्थ बेमुदत उपोषण करण्यात येईल वेळेप्रसंगी आत्मदहन करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
प्रत माहिती साठी.
1) माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई
२) मा. राज्यपाल साहेब राजभवन महाराष्ट्र मुंबई.
३) मा. क्रीडा व शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई
४) मा. जिल्हा क्रीडा अधिकारी साहेब अहमदनगर