कोतवालीत आता ” कायद्याचे सुराज्य !” पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाडांची नियुक्ती..

अहिल्यानगर (प्रतिनिधी):
कोतवाली पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदी नियंत्रण कक्षातील कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय अधिकारी संभाजी गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी हा महत्वाचा आदेश जारी करताच शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
तीन दिवसांपूर्वी तत्कालीन निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर “कोतवालीत कोण धुरा सांभाळणार?” हा प्रश्न सर्वत्र रंगला होता. अखेर गायकवाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच चर्चांना पूर्णविराम मिळाला.
संभाजी गायकवाड हे पोलिस खात्यातील कडक शिस्तप्रिय, पक्षपातीविरहित आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जातात. याआधी त्यांनी जामखेड व पारनेर येथे कामकाज करताना अनेक अवैध धंद्यांवर गंडांतर आणले होते.
👉 कोतवाली हद्दीतील अवैध व्यवसायांना आता फुलस्टॉप मिळणार याबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
👉 कायद्याचे खरे “सुराज्य” प्रस्थापित होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
👉 गायकवाड यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसणार असल्याचा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.
प्रताप नव्हे, आता संभाजी…!
कोतवाली पोलीस ठाणे आता नव्या जोशात व सुशासनाच्या मार्गावर…
अधिकाऱ्यांच्या चुकीच्या गोष्टीमुळे कोतवाली पोलीस स्टेशनवर एक काळा डाग पडला आणि तेच पुसण्याचं मोठ आव्हान आता पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्याकडे आहे आतापर्यंतच्या कामाच्या अनुभवावरून आणि त्यांच्या कर्तव्यनिष्ठ शिस्तप्रिय कडक स्वभावामुळे नक्कीच हे चित्र बदलण्यात मोठे योगदान राहिलं