अधिवेशनाचा 4था दिवशी विधानभवनात बाहेर एका व्यक्तीसोबत अत्यंत धक्कादायक प्रकार घडला.

ग्रामीण भागातून आलेला एका व्यक्तीने जाळून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत ही व्यक्ती चांगलीच भाजली आहे. जेव्हा आग विझवण्यात आली तेव्हा या व्यक्तीचे संपूर्ण अंग भाजल्यामुळे या व्यक्तीच्या अंगावरची कातडी वेगळी झाली होती. या व्यक्तीने आत्मदहन करण्याचा प्रयत्न का केला हे समजू शकले नाही मात्र ही व्यक्ती कांदळगावचे असल्याची माहिती समोर येते.
ही व्यक्ती सध्या गंभीरित्या भाजलेली दिसत आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. विधानसभेत अधिवेशन सुरू आहे त्यामुळे परिसरात कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली या अशातही ही व्यक्ती स्वतः अंगावरती रॉकेल घेऊन स्वतःला पेटवून घेत आहे. पोलीस याची माहिती घेत आहेत या व्यक्तीचे नाव सुभाष भानुदास देशमुख (वय 45) असल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेचे पडसाद सभागृहातही उमटले आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सर्वप्रथम हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. ही व्यक्ती सातारातील असल्यास त्यांनी सांगितलं यावरती विधानसभा अध्यक्ष यांनी ती व्यक्ती उस्मानाबादच्या असल्यास म्हटलं. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये वाद झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूत्र हातात घेण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तींन आत्मदहन केल्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे.
गावातील शेतीसंदर्भात असलेल्या वादातून संबंधित व्यक्तीने हे कृत्य केले आहे. आम्ही लवकरच सभागृहाला यासंदर्भात माहिती देऊ. विधानसभा अध्यक्ष हे अजित पवार यांना बोलू देत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस नाराज झाले. जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांवरती पक्षपातीचा आरोप केला विरोधी पक्षनेता बोलल्यानंतर तुम्ही बोलायला हवे होते असं जयंत पाटील हे म्हणाले. त्यानंतर सभागृहामध्ये एकच गोंधळ पाहायला मिळाला.
या सगळ्यांमध्ये या व्यक्तीने विधानभवनाच्या बाहेर येऊन आत्मदहन करण्याचा जो प्रयत्न केला यामध्ये तो व्यक्ती पूर्णपणे भाजलेला आहे. त्याला उपचार सुरू आहेत याच्या मागचं कारण काय आहे हे पाहणं फार महत्त्वाचा आहे. कारण यापूर्वी देखील मंत्रालयामध्ये एका शेतकऱ्याने तिसरा मजल्यावर उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे याची पुनरावृत्ती पुन्हा होती की काय अशी खंत आहे.
सध्या मोठ्या प्रमाणात काही भागांमध्ये पाऊस झालेला आहे. त्याचे पंचनामे झालेले नाहीयेत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाहीये ग्रामीण भागातला जो शेतकरी वर्ग आहे. तो या महागाईने देखील मेटाकुटिला आलेला आहे. या सगळ्या गोष्टी असतानाच एका व्यक्ती विधानभवनाच्या बाहेर येऊन हातात रॉकेल घेऊन पेटवून घेतोय आणि यामध्ये तो चांगला भाजला जातोय हे अत्यंत धक्कादायक आहे या वरती आता काहीतरी ठोस भूमिका घेण्याची चर्चा राज्यभरात रंगू लागली..